चमकदार त्वचेसाठी हळदीचे ‘हे’ फेसपॅक वापरून पाहा!

प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या.

स्वयंपाकघरात असणारे मसाले आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या मसाल्यांपैकी एक म्हणजे हळद. पण तुम्हाला माहिती आहे का की हळदीचा वापर केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जात नाही तर त्वचेचा रंग उजळवण्यासाठी देखील केला जातो.  दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली हवी असेल तर हे घरगुती उपाय करा आणि चमकदार त्वचा मिळवा.

कच्च्या हळदीची पेस्ट लावण्याचे फायदे

त्वचेवरील डाग कमी होतात

कच्च्या हळदीची पेस्ट चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेला उजळ आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. हळदीचा फेस मास्क लावल्याने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात, टैनिंग कमी होते आणि डाग-धब्बे कमी होतात.

  • एक चमचा हळद आणि 2 चमचे दूध मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेसपॅक आठवड्यात 2-3 वेळा लावू शकता. 
  • एक चमचा हळद पावडर, एक चमचा चंदन पावडर गुलाबपाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

त्वचा उजळण्यासाठी

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात,जे त्वचेला उजळायला मदत करतात. चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, हळद आणि दुधाची पेस्ट एक प्रभावी उपाय आहे. 
  • १ चमचा हळद पावडर, २ चमचे बेसन, दही किंवा दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि १५-२० मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. नियमित वापर केल्यास त्वचा चमकदार आणि निरोगी दिसेल. 

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी

कच्च्या हळदीची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आहे. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेला नुकसान होण्यापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. तसेच, हळदीमुळे त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचा अधिक मजबूत आणि ताजीतवानी राहते. कच्च्या हळदीची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी आहे, तसेच त्वचेला नुकसान होण्यापासूनही संरक्षण करते. नियमित वापर केल्यास त्वचेला चांगली चमक मिळण्यास मदत होते.

  • १ चमचा हळद पावडर आणि २ चमचे कोरफडीचे जेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
  • १ चमचा हळद पावडर आणि १ चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News