१०० दिवसाच्या आराखड्यानंतर आता १५० दिवसांचा उपक्रम, कसा असणार १५० दिवसांचा कार्यक्रम?

या १६ विभागांमध्ये नगरविकास, भूमी, पाणी, पायाभूत सुविधा, कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान, मानव संसाधन, वित्त, उद्योग, सेवा, कल्याण आणि सुरक्षा या विभागांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

Mahayuti Government : महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागातील कामांना चालना देण्यासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा आणला होता. या १०० दिवसांत ज्या विभागाने आणि अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली… प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली आहे. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला. १०० दिवसांचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी आगामी १५० दिवसांच्या उपक्रम आणला आहे. हा १५० दिवसांचा उपक्रम नेमका आहे कशा? पाहूया…

व्हिजन डॉक्युमेट तयार करा…

दुसरीकडे तीन टप्प्यात हे व्हिजन तयार करावे. १५० दिवसाच्या सेवाविषयक प्रशासकीय सुधारणामध्ये कार्यालयीन सेवा अधिक सुलभ, व्यावसायिक सेवा सुलभ आणि केंद्रांच्या विविध विभागांशी समन्वय साधणे गरजेचे आहे असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. तसेच १०० दिवसांचा यशस्वी कार्यक्रम झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘विकसित भारत २०४७’ च्या पाशर्वभूमीवर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

निकाल २ ऑक्टोबर २०२५ रोजी…

दरम्यान, ६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ हा पुढील १५० दिवसांचा उपक्रम असणार आहे. तर १५० दिवसाच्या उपक्रमाचा निकाल २ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. १६ शासकीय विभागांचे एकत्रीकरण करून संबधित विभागातील अधिकारी, सचिव याचे उद्दीष्ट निश्चित करतील. तसेच विभागातील कामांची पूर्तता, विभागातील आव्हाने, बलस्थाने यावर काम करतील. १५० दिवसांचा कार्यक्रमांत १६ विभागांचा समावेश असणार आहे. तसेच या शासकीय सेवेमध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News