जयपूर: वैभव सूर्यवंशी हा 14 वर्षांचा क्रिकेटपटू सध्या भारताच्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने 2025 आयपीएलच्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पण करताना 38 चेंडूत 101 धावा करून पुरुष T20 क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीर होण्याचा ऐतिहासिक विक्रम केला. वैभव सुर्यवंशीच्या या कामगिरीने क्रिकेट विश्वाच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. वैभव सुर्यवंशीबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
अशी झाली सुरूवात
क्रिकेट प्रवास 12 वर्षांच्या वयात रणजी ट्रॉफीमध्ये बिहार संघाकडून पदार्पण करून सुरू झाला. त्यावेळी तो भारतातील चौथा सर्वात तरुण प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ठरला. त्याच्या यशामागे त्याचे कठोर परिश्रम आणि समर्पण आहे. वयाच्या 14 व्या वर्षीच त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहार संघाकडून 71 धावांची अर्धशतकी खेळी करून लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात तरुण अर्धशतकवीर होण्याचा विक्रम केला. आता या नव्या यशामुळे त्याला क्रिकेट दिग्गजांकडून प्रशंसा मिळाली आहे. सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि राहुल द्रविड यांसारख्या दिग्गजांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले आहे. सूर्यवंशीच्या या यशामुळे तो भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील एक महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. त्याच्या खेळातील निपुणता आणि चिकाटी यामुळे तो क्रिकेटच्या आकाशातील एक चमकता तारा बनला आहे.

वैयक्तिक आयुष्य
वैभव सूर्यवंशी हा बिहार राज्यातील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावचा 14 वर्षीय क्रिकेटपटू आहे. त्याच्या कुटुंबीयांचा पारंपरिक शेती व्यवसाय आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट शिकवायला सुरुवात केली. वडिल संजीव सूर्यवंशी यांनी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेट शिकवण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली. त्यासाठी त्यांनी स्वतःची जमीन विकली आणि समस्तीपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पटेल मैदानात त्याला प्रशिक्षण दिले. वैभवच्या वयावर शंका घेतली असता, त्याच्या वडिलांनी सांगितले की, “तो साडेआठ वर्षांचा असताना त्याच्या हाडांची बीसीसीआयने चाचणी केली होती. ही बाब विशेष आहे.
वैभवचं हे दिमाखदार यश अनेक दिग्गजांच्या नजरेत आलं आहे, भविष्यात वैभवला भारतीय क्रिकेट टीमकडून खेळण्याची संधी जरी मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको. हे मात्र नक्की. अवघ्या 35 चेंंडूंत शतक झळकावत वैभवने एक नवा विक्रम रचला आहे, एवढ नक्की. त्याच्यावर आता भारतातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.