मुंबई -29 एप्रिल ही तारीख प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक जीन-जॉर्जेस नोव्हेरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात येत असली तरी नृत्य कलेच्या उगम आणि प्रसार याबाबत संशोधन करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य समिती आणि युनेस्को यांच्या पुढाकाराने हा दिवस सुरू झाला. महाराष्ट्रात सुध्दा ही कला समृद्ध आहे. त्यामुळे याबाबत संशोधन करुन त्याबद्दलचा शोधनिबंध युनोस्कोला सादर करु, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज येथे केली.
भारतीय नृत्य कलेची ही मोठी परंपरा
दरम्यान, जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने आज गिरगावातील साहित्य संघ मंदिर येथे नृत्य कलेचा कार्यक्रम नृत्य कला निकेतन या खाजगी संस्थेने आयोजित केला होता. या कार्यक्रमातात प्रमुख पाहुणे म्हणून. बोलताना अँड आशिष शेलार पुढे म्हणाले की, ज्यांच्या नावाने दिवस साजरा होत असला आणि 300 वर्षांचा कालखंडाच्या मागे अगदी मोहेंजोदडो पर्यंत नृत्य कलेचे संदर्भ सापडतात तसेच ते भगवान शंकराच्या तांडव नृत्यापर्यंत ही आहेत. भारतीय नृत्य कलेची ही मोठी परंपरा असून महाराष्ट्रात ही समृद्ध परंपरा आहे. त्यामुळे याबाबत अभ्यास करण्याची गरज आहे. या कामात सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेऊन शोध निबंध युनोस्कोला सादर करेल, असे शेलार यांनी जाहीर केले.

बांद्रा येथील आगीची सर्वंकष चौकशी करा
दुसरीकडे वांद्रे येथील लिंकिन रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. यामुळे क्रोमा शोरूमचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे 4 वाजता आग लागली, याबाबतचे माहिती मिळताच पहाटेपासून स्थानिक आमदार आणि उपनगर पालकमंत्री आशिष शेलार संबंधित यंत्रणांच्या संपर्कात होते. तसेच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी ही केली.सदरची घटना दुदैवी असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी इमारत आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील व्यापारी आणि या इमारतीच्या निर्माणात सहभागी असलेल्या माजी आमदार झिशान सिध्दीकी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्याची उत्तरे मिळणे आवश्यक आहेत. म्हणजे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रकरणी चौकशी करावी असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले आहेत.