कोलकताचा चौथा विजय, प्लेऑफसाठी आशा उंचावल्या, दिल्लीचा पराभव

कोलकाताने 205 धावांचे टार्गेटचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात निराशजनक झाली.ओपनर अभिषेक हा अवघ्या चार धावांवर बाद झाला. दिल्लीकडून डुप्लेसीच्या 62 धावा आणि अक्षरच्या 43 धावा वगळता सर्वच फलंदाजांनी निराशा केली.

दिल्ली : आयपीएलच्या कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटलच्या सामन्यात कोलकताने दिलेले 205 धावांचे आव्हान दिल्लीला पेलवता आले नाही. दिल्ली संघ  190 धावा करता आल्या.  14 रन्सने मिळालेल्या विजयाने कोलकाता संघाचा प्लेऑफसाठी आत्मविश्वास उंचावला. सुनील नारायण याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चमक दाखवून कोलकताचा विजय सुकर केला. यंदाच्या आपयपीएलमधील कोलकाताचा हा चौथा विजय.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताची सुरुवात धडाकेबाज झाली. ओपनर गुरुबाज आणि सुनील नारायण याने टोलेबाजी करत तीन ओव्हरमध्ये 48 धावा केल्या. मात्र, मिचेल स्टार्कच्या बाॅलवर गुरुबाज अक्षर पटेलकडे कॅच देऊन आऊट झाला.त्याने अवघ्या 12 चेंडूत 26 धावा केल्या. तो आऊट झाल्यानंतर सुनील नारायणने आपली टोलेबाजी सुरुच ठेवली. मात्र तो देखील 26 धावांवर असताना बाद झाला. विपराज निगमने त्याला एलबीडब्लू आऊट केले.

रघुवंशीने सावरले

चांगल्या सुरुवातीनंतर देखील कोलकाताची अवस्ता तीन बाद 91 झाली होती. अजिंक्य राहणे हा 26 धावांवर आऊट झाला. त्यानंतर अंगकृष्ण रघुवंशी याने संयमी खेळी करत कोलकत्ताचा डाव सावरला. त्याने 32 चेंडूत 44 धावा केल्या. त्यामध्ये त्याने दोन सिक्स आणि तीन चौकार लगावले. रिंकु सिंग याने देखील चांगली फटकेबाजी केली मात्र मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याने 25 चेंडूत 36 धावा केल्या. त्यात त्याने तीन चौकार आणि एक सिक्स लगावला.

सुनील नारायण चमकला

कोलकताला बॅटींगमध्ये धडाकेबाज सुरुवात करून देणाऱ्या सुनील नारायण याने बाॅलिंमध्ये देखील कमाल केली. त्याने 29 धावा देत तीन फलंदाजांना आऊट केले. दिल्लीकडून धडाकेबाज बॅटींग करणारा डुप्लेसी याला रिंकू सिंगकडे कॅच आऊट करून त्याने सामना कोलकताच्या बाजुने झुकवला. डिप्लेसीने 62 धावांची शानदार खेळी केली.दिल्लीकडून मिचेल स्टार्क याने देखील तीन फलंदाजांना आऊट केले.

दिल्लीच्या मधली फळी अपयश

कोलकाताने 205 धावांचे टार्गेटचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात निराशजनक झाली.ओपनर अभिषेक हा अवघ्या चार धावांवर बाद झाला. दिल्लीकडून डुप्लेसीच्या 62 धावा आणि अक्षरच्या 43 धावा वगळता सर्वच फलंदाजांनी निराशा केली. मधल्या फळतील फलंदाज मोठ्या खेळ्या करू शकले नाहीत. चौथ्या क्रमांकावर आलेल्या के एल राहुलला सुनील नारायणने रनाआऊट केले.

 

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News