जसप्रीत बुमराह हा टेस्ट, वनडे आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 300 हून अधिक बळी घेतले आहेत. बुमराहला अनेकदा टीम इंडियाचा ‘तुरुपाचा एक्का’ म्हणून संबोधले जाते. मात्र, तो वारंवार दुखापतीने त्रस्त राहतो. चला, जाणून घेऊया की जसप्रीत बुमराहच्या वारंवार होणाऱ्या दुखापतीचं खरे कारण काय आहे?
बुमराहला वारंवार दुखापत का होते?
जसप्रीत बुमराहच्या सतत दुखापतीमागे अनेक कारणं आहेत, पण त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा बॉलिंग अॅक्शन. देश-विदेशात अनेक जण बुमराहच्या अनोख्या अॅक्शनची नक्कल करताना दिसतात, पण प्रत्यक्षात ही अॅक्शन त्याच्या शरीरावर अधिक ताण आणते.

बुमराह गोलंदाजी करताना कमरेवर सर्वाधिक जोर देतो आणि यामुळे त्यांच्या मणक्याला इतर गोलंदाजांच्या तुलनेत अधिक स्ट्रेच व्हावे लागते. मात्र, यासंदर्भात कुठल्याही वैद्यकीय संस्थेने अजून पर्यंत स्पष्ट पुरावा दिलेला नाही.
वर्कलोड मॅनेजमेंट का गरजेचे?
बुमराहच्या दुखापतीमागे मुख्य कारण मानले जाते ते म्हणजे त्याचा शरीरावर येणारा ताण, विशेषतः कमरेवरचा भार. त्यामुळेच बुमराहबाबत नेहमी ‘वर्कलोड मॅनेजमेंट’ हे संज्ञा वापरण्यात येते. त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे तो अनेक वेळा दीर्घ स्पेल्स टाकू शकत नाही.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील दुखापत
2024-25 मध्ये झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात बुमराह दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. यानंतर त्याला अनेक आठवड्यांपर्यंत क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. त्याच दुखापतीची भीती आणि वर्कलोड लक्षात घेऊन त्याला इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये विश्रांती देण्यात आली होती.
जसप्रीत बुमराहच्या दुखापती मागे त्याची अनोखी गोलंदाजी शैली आणि त्यातून होणारा शारीरिक ताण हे प्रमुख कारण आहे. त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देणे आणि योग्य वेळी विश्रांती देणे हेच त्याला खेळात सातत्याने टिकवून ठेवण्याचा मार्ग आहे.