तू बाहेर ये तुला पण दाखवतो…गद्दार कुणाला बोलतो? देसाई-परब थेट सभागृहातच आरे-तुरेवर

ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात मराठी माणसाला ५० टक्के घरे देण्याचे कुठलेही धोरण स्वीकारले नव्हते. त्यावरून अनिल परब यांनी तुम्ही त्या सरकामध्ये मंत्री होता..

Mansoon Session : आज पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेतील सभागृहात मुंबईत मराठी माणसाला नव्या इमारतीत ५० टक्के घरे राखीव ठेवण्यात यावी. यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार अनिल परब हे दोघे सभागृहातच भिडले. शंभूराज देसाई आणि अनिल परब यांनी एकमेकांना अपशब्द वापरल्याने हमरीतुमरीवर आले. एकमेकांना धमकवण्या पर्यंत प्रकरण पोहचले. दरम्यान, सभागृहात गदारोळ झाल्याने सभापती नीलम गोऱ्हे यांनी १० मिनिटे सभागृह तहकूब केले.

तू बाहेर ये तुला पण दाखवतो…

मंत्री देसाई आणि परब दोघेही आक्रमक झाले. दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी अनिल परब यांनी गद्दार शब्द वापरला. त्यावेळी शंभूराज देसाई आक्रमक होत म्हणाले, ये गद्दार कोणाला बोलतोस रे, … बाहेर ये तुला दाखवतो… यावेळी अनिल परबही संतापले. बाहेर येण्याची भाषा कोणाला सांगतो… तू पण बाहेर ये तुला पण दाखवतो. यावेळी परब आणि देसाई यांच्या खडजंगी झाली. दोघे एकमेकांत भिडले… देसाई आणि परब यांनी एकमेकांना उद्देशून वापरलेले अपशब्द कामकाजातून काढून टाकण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

…तर कारवाई करणार

दरम्यान, मांसाहार करणाऱ्या मराठी माणसाला नवीन इमारतीत घरे नाकारली जात आहेत. त्यामुळे मुंबईतील नवीन इमारतीत मराठी माणसांसाठी घरांमध्ये ५० टक्के आरक्षित ठेवण्यात यावीत, याबाबत उद्धव सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसाला कोणीही घरे नाकारू शकत नाही. याबाबत तक्रार असेल तर कारवाई केली जाईल, असेही शंभूराज देसादे यांनी स्पष्ट सांगितले.


About Author

Astha Sutar

Other Latest News