मुंबई : पंजाब विरुद्धच्या सामन्यात हैद्राबादने तब्बल 246 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणाऱ्या हैद्राबादच्या फलंदाजांनी मुंबई विरोधात मात्र नांगी टाकली. हैद्राबादने 163 धावांचे आव्हान मुंबईसमोर ठेवले. विशेष म्हणजे हैद्राबादच्या संपूर्ण डावात फक्त पाच षटकार लगावले. दिल्लीचा पराभव केल्यानंतर मुंबईने दुसऱ्या सामन्यात हैद्राबादवर चार गडी शिल्लक ठेऊन विजय मिळवता. या विजयामध्ये कर्णधार हार्दिक पांड्या चमकला. बाॅलिंगमध्ये एक विकेट घेणाऱ्या हार्दिकने अवघ्या 9 बाॅल्समध्ये 21 रन्स केले.
मुंबईने टाॅस जिंकून आपल्या घराच्या वानखेडे मैदानावर हैद्राबादला बॅटींगसाठी निमंत्रित केले. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड हे धकाडेबाज सुरुवात करतील अशी अपेक्षा असताना तो चाचपडताना दिसले. अभिषेक आणि हेड यांनी एकही षटकार लगवता आला नाही. अभिषेकने 28 बाॅल्समध्ये 40 रन्स केले. त्यामध्ये त्याने सात चौकार लगावले, तर, ट्रेव्हिस हेडने 28 रन्स तीन चौकारांच्या मदतीने केले. हार्दिक पांड्याच्या बाॅलिंगवर अभिषेक कॅच आऊट झाला.

धावांसाठी संघर्ष
अभिषेक आणि हेड आऊट होताच हैद्राबाद रॅन्ससाठी संघर्ष करताना दिसला. इशान किशान 2, नितेश रेड्डी 19 धावा करू शकले. हेनरिक क्लासेन याने दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 37 रन्स केले. मुंबईकडून बुमरा, बाॅल्ट, हार्दिक पांड्या यांनी प्रत्येक विकेट घेतली. तर, जॅक्सने दोन विकेट मिळवल्या.
मुंबईची टोलेबाजी
पहिल्या इनिंगमध्ये हैद्राबाद बॅटींगसाठी संघर्ष करताना दिसत असल्याने वानखेडेच्या खेळपट्टीवर धाव करने मुंबईला सोपे जाणार नाही, असे वाटत होते. मात्र, मुंबईच्या बॅटरीने आक्रमक सुरुवात करत हा अंदाज फोल ठरवला. रोहित शर्मा याने या आयपीएलमधील आपला सर्वाधिक 26धावा केल्या. त्यामध्ये त्याने खणखणीत तीन षटकार लगावले. रायन रिकेल्टन याने देखील 31 धावा केल्या. रोहित शर्माला पॅट कमिन्सने आऊट केले.तर सुर्यकुमार देखील कमिन्सने 26 रन्सवर आऊट केले.