शक्ती, भक्ती आणि मुक्तीत महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण सामावले आहे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन

प्राचीन, पराक्रमी, वैभवसंपन्न व पराक्रम मांडणारा आपला महाराष्ट्र आहे. आज ही व्याख्यानमाला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. 150 वर्षे साजरी करणारी देशातील ही एकमेव व्याख्यानमाला आहे. त्यामुळे या व्याख्यानमालेची जागतिक वारसा म्हणून युनोस्कोने दखल घ्यावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  शेलार म्हणाले.

Ashish Shelar : सांस्कृतिक धोरणात मानवाच्या उगमापासून कृत्रिम बुद्धीमत्तेपर्यंतचा विचार करण्यात आला आहे. संवाद, सहभाग, संपर्क, संवर्धन आणि सहजानंद हे सांस्कृतिक धोरणाचे मुख्य पैलू आहेत. पुढील 25 वर्षांच्या दूरदृष्टीचा त्यात समावेश असल्याचे मत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या 150व्या ज्ञानसत्रातील जयंतराव टिळक स्मृती व्याख्यानात ‘महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण’ या विषयावर शेलार बोलत होते. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, कार्यवाह डॉ. गीताली टिळक यावेळी उपस्थित होते.

सांस्कृतिक धोरणात 172 तरतुदींचा समावेश

राज्यात प्रत्येक 24 कि.मी. नंतर लोककला बदलतात. त्यामुळे राज्यातील सांस्कृतिक केंद्र आणि सांस्कृतिक संस्थांना बळकटी देण्यासंदर्भातही आर्थिक तरतुदीची व्यवस्था करण्यात आले असल्याचे शेलार म्हणाले. या धोरणात लोककला, लोक परंपरा, चित्रकला, नृत्य, नाटक, चित्रपटांचा समावेश आहे. शक्ती, भक्ती आणि मुक्तीत महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण सामावले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणात 172 तरतुदींचा समावेश आहे. 2010 मध्ये पहिले धोरण मांडण्यात आले. 2024 मध्ये दुसरे धोरण तयार करण्यात आले.

राज्यासह देशात सृजनशिलतेचा खजिना

शंकराचे तांडव हे पहिले नृत्य आहे. राज्यासह देशात सृजनशिलतेचा खजिना आहे. संस्कृती समाजातील प्रत्येक घटकाला जोडली गेली आहे. तिची व्याप्ती मोठी आहे. मानवी मनाचा विकास आणि मानवी शरीराची उत्पत्ती म्हणजे आपली संस्कृती आहे. राज्यातील 12 गड आणि किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून युनोस्कोचा टॅग लागावा यासाठी सांस्कृतिक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच शौर्याचा वारसा सांगणार्‍या गड, किल्ल्यांचे जतन व संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी हा विभाग प्रयत्नशील आहे. असे शेलार यावेळी म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News