“पैशांची एखादी बॅग देऊ… आजकल हमारा नाम बहुत चल रहा है,” संजय शिरसाटांचे विधान चर्चेचा विषय

"पैशांची एखादी बॅग देऊ... आजकल हमारा नाम बहुत चल रहा है," अशी मिश्कील शैलीत केलेली टिप्पणी सध्या पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याबाबत चर्चेचा विषय बनली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट सातत्याने अनेक वादग्रस्त विषयांमुळे चर्चेत येत आहेत. दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांनी कथित पैशांनी भरलेल्या बॅगेसोबतचा त्यांचा व्हिडिओ ट्वीट केला होता. त्यानंतर आता “पैशांची एखादी बॅग देऊ… आजकल हमारा नाम बहुत चल रहा है,” अशी मिश्कील शैलीत केलेली टिप्पणी सध्या पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याबाबत चर्चेचा विषय बनली आहे. शासकीय रुग्णालयातील गरजांसाठी निधीची मागणी झाल्यानंतर त्यांनी हा उद्गार काढला. त्यांच्या या वाक्याने उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली असली यामुळे शिरसाटांवर टीकेच झोड उटण्याची देखील शक्यता आहे.

पैशांची एक बॅग पाठवतो -संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कर्करोग संस्थेत डिजिटल मॅमोग्राफी यंत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री शिरसाट बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी रुग्णालयातील वॉर्ड, स्वच्छतागृह आणि इतर देखभाल व लहान बांधकामांसाठी आवश्यक निधीची मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री शिरसाट म्हणाले, “पैशांसाठी काही अडले, असे समजण्याचे काहीच कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत. आजकाल आमचं नाव खूप चालतंय. त्यामुळे पैशांची चिंता करू नका. एखादी बॅगच पाठवतो तुमच्याकडे.”

त्यांच्या या हलक्याफुलक्या भाष्याने क्षणभर वातावरण हलकं झालं, परंतु “बॅग” या शब्दाच्या राजकीय अर्थछटा लक्षात घेता, काही वर्तुळांमध्ये या विधानाची गंभीर दखल घेतली जात आहे.  शिवाय खा. संजय राऊतांनी शिरसाटांचा चर्चेत आणलेला बॅगेचा विषय देखील महत्वाचा आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार गेल्या काही दिवसांपासून चांगलेच गोत्यात येताना दिसत आहेत. आता मंत्री संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. शिरसाट यांच्या हातात पैशांची बॅग असलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी समोर आणला होता. त्यामध्ये दोन बॅगा दिसत आहेत. त्यापैकी एका बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला. मात्र, त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट चांगलेच आक्रमक झाले आहेत.

‘राऊतांवर अब्रु नुकसानीचा दावा टाकणार’

या व्हिडिओ प्रकरणावर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, ‘मला बदनाम करण्यासाठी हा मोर्फ व्हिडीओ वापरला. मी ठरवलंय की, अशा लोकांना धडा शिकवायला हवा. स्वप्ना पाटकरबाबत त्यांचे व्हिडीओ पाहा मग तुम्हाला कळेल ते कसे आहेत. माझा तो व्हीडिओ हे माझं चारित्र्यहनन आहे. मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी माफी मागितली नाही तर गुन्हा दाखल करेन, ‘ अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी इशारा दिला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News