MHADA Lottery 2025 – तुम्ही जर घर घेण्याचा तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आणि वाचावीच अशी आहे. कारण सर्वसामान्यासाठी एक आनंदाची व महत्वाची बातमी समोर येत आहे. आयुष्यात आपले स्वत:चे एक स्वप्नातील घर असावे, असे प्रत्येकाचे इच्छा आणि स्वप्न असते. पण हे स्वप्न सर्वांचेच पूर्ण होत असे नाही. कारण जागांचे व घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा आहेत.
त्यामुळं इच्छा असूनही अनेकांना खर खरेदी करता येत नाही. पण म्हाडाकडून तुम्ही परवडणारे घर खरेदी करु शकता. म्हाडा लवकरच 5,285 घरांची लॉटरी काढणार आहे. यासाठी जाहिरात देखील आली आहे. व यासाठी तुम्ही अर्जही करु शकता.

77 भूखंडांचा देखील समावेश…
याव्यतिरिक्त दुसरीकडे मुंबईच्या हाकेवर म्हणजे बदलापुरातील कुळगाव-बदलापूर या ठिकाणी 77 भूखंडांचा देखील या लॉटरीत समावेश करण्यात आला आहे. तर 5,285 घरांची लॉटरीमध्ये 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेची ३ हजार घरांचा समावेश आहे. 20 टक्के सर्व समावेशक योजनेची 565 घरे आहेत. आणि अन्य 1677 घरं आहेत. त्यामुळं ही परवडणारी घरांसाठी सर्वसामान्यांनी अर्ज दाखल करावे, असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.
घरं कोणत्या ठिकाणी असणार?
दरम्यान, ही घरांची लॉटरी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून काढण्यात येणार आहे. तसेच घरांच्या लॉटरीसह म्हाडाकडून 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. कोकण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या या घरांच्या लॉटरीमध्ये सिंधुदुर्गातील ओरोस या ठिकाणी घरांचा समावेश आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील वसई या शहरात घरांचा समावेश आहे. तर ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर येथे घरं उपलब्ध असणार आहेत.
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कशी?
- 14 जुलै 2025 रोजी १ वाजल्यापासून अर्ज विक्री व स्वीकृतीस सुरू होणार
- 13 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार
- ऑनलाइन पद्धतीने अनामत रक्कम भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंतची मुदत
- 21 ऑगस्ट 2025 रोजी स्विकारलेल्या अर्जाची यादी जाहीर
- जाहीर झालेल्या यादीवर आक्षेप असल्यास हरकती आणि दावे नोंदवण्यासाठी 25 ऑगस्टपर्यंत मुदत राहणार
- 1 सप्टेंबर 2025 रोजी स्विकृत अर्जाची अंतिम यादी जाहीर होणार
- 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी १० वाजता संगणकीय पद्धतीने लॉटरीची सोडत काढली जाणार