Sanjay Raut : दिल्ली नेत्यांकडून मुंबईला लुटण्याचे काम सुरु आहे, त्याचे उदाहरण म्हणजे धारावी प्रकल्प आहे. महाराष्ट्राला, मुंबईला आणि मराठी माणसाला संपविण्याचे दिल्लीच्या नेत्यांकडून काम सुरु आहे. त्यामुळं मुंबई लुटणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला खासदार संजय राऊतांनी भाजपा नेत्यांना लगावला. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
तुमच्या मनातील होईल…
दरम्यान, दोन ठाकरे बंधू उद्धव-राज एकत्र येण्यावरुन आता बरीच चर्चा झाली आहे. लोकांची भावना आहे की, हे दोन भाऊ एकत्र यावेत. उद्धव ठाकरे म्हणालेत की, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील होईल. तुमच्या मनात आहे ते होईल, फार चर्चा नको. फार चर्चा न करता निर्णय झाले पाहिजेत. मुंबई महानगरपालिका निवडणुका एकदा जाहीर होऊ दे मग बघू, पण तुमच्या मनातील होईल, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

सत्ताधाऱ्यांचे डोके ठिकाण्यावर आहे का?
दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानीसाठी तयार केले जात आहे. प्रत्येक प्रकल्प अदानीसाठी बनवला जात आहे. सत्ताधाऱ्यांचे डोके ठिकण्यावर नाही… केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे धनदांडग्यासाठी… आणि अदानींसाठी सर्व काही करत आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. दुसरीकडे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्लांना जागतिक वारसा अर्थात युनोस्कोच्या यादीत स्थान मिळाले आहे.
शिंदेंच्या मंत्र्यांची चौकशी करा…
संजय शिरसाटांचा व्हीडिओ मॉर्फ केला नाही, तो ओरिनल व्हीडिओ आहे. व्हीडिओची सत्यता फॉरेन्सिक लॅब ठरवेल. दुसरीकडे मद्य विक्रिस ज्या परवान्यास मान्यता देण्यास आली आहे, त्यातील मंत्री, सत्ताधारी यांच्या घरात किती मद्यपानाचे परवाने किती गेले? हे तपासा. महायुती सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार होत आहे, सर्व ठिकाणी भ्रष्टाचार केला जात आहे. जिथे भ्रष्टाचार आहे तिथे स्थगिती दिली जाते. शिंदे गटाच्या ५ मंत्र्यांची चौकशी करा, एनक्लुडिंग उदय सामंतांची पण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली.