लोकशाही प्रबळ करण्यासाठी प्रयत्न करणार, उज्वल निकमांची प्रतिक्रिया, निकमांचे महत्वाचे खटले कोणते? 

आपल्याला एक विधायक काम करायचं आहे. हा देश हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत एकसंघ कसा राहिल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. देशातील लोकशाही, संविधान कशाप्रकारे प्रबळ राहील यासाठी काम करायचे.

Ujjwal Nikam : सरकारी वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी माझ्याशी मराठीत संभाषण केलं. त्यांनी सांगितले की, राष्ट्रपती महोदय तुमच्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छितात. ही जबाबदारी देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळू शकाल. यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, असं मोदी म्हणाले. अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर निकम यांनी दिली आहे.

देशाच्या ऐक्याकरिता…

दरम्यान, कायद्याचा अभ्यास… कायद्याचे विश्लेषण या देशाच्या ऐक्याकरिता देशातील लोकशाही… संविधान कशारितीने प्रबळ राहील, याकरिता माझ्या बुद्धीच्या कुवतेप्रमाणे निश्चितच मी प्रयत्न करेन, असं मी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो. लोकशाही आणि संविधान प्रबळ करण्यासाठी प्रयत्न करणार, भाजपाने लोकसभेच्या वेळी माझ्यावर जो विश्वास दाखवला होता. तो आता मी राज्यसभेच्या खासदार म्हणून निश्चितपणे प्रामाणिकपणे सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन. अर्थात राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळे माझ्यावर जबाबदारी मोठी आहे. असं निकम म्हणाले.

देश एकसंघ कसा राहिल यासाठी प्रयत्न करायचे…

जबाबदारी जरी मोठी असली तरी आपल्या सगळ्यांचे मला शुभ आशीर्वाद मिळतील, देश एकसंघ कसा राहिल हे दाखवायचं आहे. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर पाकिस्तानने सांगितले की, 26/11 चा कट आमच्या देशात रचला होता, असा पुरावा कुठेही नाही आहे. त्याला उत्तर देताना आम्ही डिव्हिड हेडलीची साक्ष घेतली. ही साक्ष घेण्याकरिता देशाची गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी मदत व सहकार्य केले, त्यामुळं हेडलीची मी साक्ष घेऊ शकलो. ज्यामुळे पाकिस्तानचा बुरगा फाडू शकलो.

परिणामी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या खरा चेहरा समोर आला. आपल्याला एक विधायक काम करायचं आहे. हा देश हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत एकसंघ कसा राहिल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. 

कोण आहेत उज्ज्वल निकम?

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एलएलबीच शिक्षण जळगावातच पूर्ण केलं. सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात वकील म्हणून करीअरला सुरुवात केली. याच कोर्टात सरकारी वकील म्हणून काम केलं. आक्रमक आणि अभ्यासू वकील अशी त्यांची ख्याती आहे. अभ्यासू आणि खोल विश्लेषण यात निकम यांचा हातखंडा आहे. तसेच विरोधी पक्षातील वकिलाचा युक्तीवाद खोडून मुद्देसूद मांडणी आणि आक्रमकपणा ही निकम यांचे जमेची बाजू आहे.

उज्ज्वल निकमांनी लढवलेले महत्वाचे खटले?
  • अंबरनाथमधील बॉम्बस्फोट खटला
  • गुलशनकुमार हत्या प्रकरण
  • खैरलांजी हत्याकांड
  • अंजनाबाई गावित हत्याकांड
  • 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला
  • पोलीस कर्मचारी सुनिल मोरे बलात्कार प्रकरण
  • प्रमोद महाजन हत्या प्रकरण
  • शक्ती मिल बलात्कार प्रकरण
  • 26/11 मुंबईवरील दहशतवादी ह्ला, यात कसाबला फाशावर लटकवण्यात महत्वाची भूमिका
  • कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण
  • मस्साजोग, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण

About Author

Astha Sutar

Other Latest News