‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर अश्लिलतेचा कळस झाला’; व्हिडिओ जारी करत चित्रा वाघ कुणावर भडकल्या?

गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने ओटीटीवरील आक्षेपार्ह आशयाला आवर घाला, अशी नोटीस जारी केली होती. याच मुद्द्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एजाज खानला लक्ष्य केलं आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने उल्लू ओटीटी अॅप, प्राईम यासह केंद्र सरकारला एक नोटीस बजावली होती. यामध्ये विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील आक्षेपार्ह आशयावर नियंत्रण ठेवा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आता त्याच मुद्द्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी ओटीटी उल्लू अॅप आणि एजाज खान याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे, ते सविस्तर समजून घेऊ…

चित्रा वाघ यांची काय मागणी?

चित्रा वाघ यांनी एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ जारी केला आहे, त्यामध्ये ‘स्वत:ला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानच्या हाऊस अॅरेस्ट शोवर तात्काळ कारवाई करा, तो शो बंद करा. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लिलतेला मोकळे रान देणाऱ्या उल्लू सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील तात्काळ कारवाई करा’ अशी मागणी चित्रा वाघ करताना दिसतात. तशी मागणी चित्रा वाघ यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

समाजाच्या सर्व स्तरांतून कारवाईची मागणी

सरकारने या कारवाईसाठी माहिती तंत्रज्ञान कायदा, भारतीय दंड संहिता आणि महिलांच्या अश्लील प्रतिमेच्या विरोधातील कायद्यांचा आधार घ्यावा, अशी मागणी समाजाच्या सर्व स्तरांतून सोशल मिडियावर होत आहे. अश्लिलतेला खुली मिळणारी सुट बंद व्हावी, असंही म्हटलं जात आहे. या प्लॅटफॉर्म्सवरील सामग्रीमध्ये शिक्षक-विद्यार्थी संबंध, कुटुंबातील अनैतिक संबंध आणि अश्लील दृश्ये यांचा समावेश असतो, ज्यामुळे सामाजिक नैतिकतेला धक्का बसतो.

वर्षभरापूर्वी सरकारने केली होती कारवाई

भारतामध्ये ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सवरील  अश्लील सामग्रीच्या वाढत्या प्रसारामुळे सरकारने कठोर पाऊल उचलले होते. मार्च 2024 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, 19 वेबसाइट्स, 10 अ‍ॅप्स आणि 57 सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली. या प्लॅटफॉर्म्सवर अश्लील, अश्लील आणि काही प्रकरणांमध्ये अश्लील सामग्री प्रसारित केली जात होती, ज्यामुळे महिलांची अवहेलना आणि सामाजिक मूल्यांचे उल्लंघन होत होते.

आता अशाच स्वरूपाची कारवाई एजाज खानचा हाऊस अरेस्ट शो आणि उल्लू अॅपवर व्हावी अशी मागणी केली जात आहे. चित्रा वाघ यांनी एजाज खानवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News