देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात सध्या तापमानाच कहर पाहायला मिळत आहे. सरासरी आणि साधारण तापमान 43°C असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जळगावात 46°C तापमानाची नोंद करण्यात आली होती. राज्यातील उष्णतेच्या लाटेने 2 मे 2025 रोजी तापमानाच्या विक्रमांची नोंद केली आहे. ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात 42°C पर्यंत तापमान पोहोचले असून, दुपारी 43°C पर्यंत पोहोचते. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांची शक्यता अधिक आहे.
कोणत्या शहरात किती °C तापमान?
नागपूरमध्ये 40°C पर्यंत तापमान पोहोचले असून, चंद्रपूर आणि अकोला येथेही उष्णतेची लाट सुरू आहे. अकोला येथे 44°C पर्यंत तापमान नोंदवण्यात आले आहे. कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक येथेही उष्णतेची लाट सुरू आहे. नाशिकमध्ये 42°C पर्यंत तापमान पोहोचले असून, कोल्हापूर आणि सोलापूर येथेही उष्णतेची लाट सुरू आहे. मुंबईत 33°C पर्यंत तापमान पोहोचले असून, उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर हे जिल्हे सध्या होरपळून निघत आहेत.

उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव
उष्णतेच्या लाटांमुळे शेतकरी, वृद्ध नागरिक आणि लहान मुले यांना विशेषतः धोका आहे. IMD ने उष्णतेच्या लाटांपासून बचावासाठी खालील सूचना दिल्या आहेत. दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा. पाणी आणि ओआरएस सारख्या द्रव्यांचे सेवन करा. जाडसर कपडे न वापरता हलके, उबदार रंगाचे आणि सुती कपडे वापरा. डोक्याला छत्री किंवा टोपीने संरक्षण द्या. शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे पाणी द्या आणि दुपारी काम टाळा.
राज्यातील हवामान परिस्थिती लक्षात घेता, नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. राज्यात काही ठिकाणी मधल्या काळात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवली जात आहे.