विवेज परिषदेतून उत्तम आणि सृजनशील कलाकार निर्माण होतील, सुपरस्टार अल्लू अर्जुनाचा विश्वास

आपल्याकडे चित्रपट उद्योग फिल्म इंडस्ट्री खूप मोठी आहे. इतक्या दशकापासून आहे. खूप मोठी परंपरा आहे, पण  तसेच भारतीय मनोरंजक क्षेत्राला जागतिक पातळीवर नेण्यासाठी अशा परिषदेची गरज होती.

allu arjun – भारतीय सिनेमात अनेक दर्जेदार आणि आशयघण चित्रपटाची निर्मिती झाली आहे. भारतीय सिनेमाला मोठी परंपरा आहे…, भविष्यात भारतीय सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवेल, असा विश्वास दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याने व्यक्त केला. मुंबईत व्हिवज परिषदेतील “टॅलेंट बियॉन्ड बॉर्डर्स” या सत्रात बोलताना अल्लू अर्जुनने यावेळी आपले मत मांडले.

मी यापूर्वी असे वैद्यकीय क्षेत्रात किंवा अन्य क्षेत्रात मोठ-मोठ्या परिषदा होताना पाहिले. परंतु मनोरंजन क्षेत्रामध्ये असे घडताना प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहतोय. पुष्पा टू सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. हा सिनेमा प्रेक्षकापर्यंत पोहोचला.

कलाकाराने आपल्या सीमा ओलांडल्या पाहिजेत

एकेकाळी प्रादेशिक अभिनेता अशी माझी ओळख होती. पण पुष्पा चित्रपट देशभरात, आंतरराष्ट्रीय पातळीवर मला ओळख निर्माण करुन दिली. जगात अनेक गोष्टी बदलत आहेत. हॉलिवूड चित्रपट, नाटक, प्रादेशिक चित्रपट या गोष्टींचा मी सतत अभ्यास करत असतो. जागतिक पातळीवर काय सुरू आहे…, काय बदलत आहे याचाही अभ्यास करत असतो. अभिनेत्याने आणि कलाकाराने आपल्या सीमा ओलांडला पाहिजेत, केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता अन्य गोष्टी सुद्धा शिकल्या पाहिजेत, असं सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी सांगितले.

चित्रपटाची कथा हेच सिनेमाचे यश

जगातील अन्य भाषेतील चित्रपट आहेत. त्यांचाही आपण आदर केला पाहिजे. मग तो हॉलीवुड चित्रपट असो, कोरियन चित्रपट असो, किंवा चीनी चित्रपट असो, प्रत्येक या देशातील चित्रपटाने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. मला वाटते की आता वेळ आली आहे की, आपणही सातासमुद्र पार आपल्या चित्रपटाच्या कक्षा, सीमा ओलांडून जागतिक पातळीवर ठसा उमटेल, असा विश्वास अल्लू अर्जुनने व्यक्त केला. पुष्पा सिनेमाच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे या चित्रपटाची कथा. सध्या स्पर्धेचे युग आहे.

आपल्याकडे चित्रपट उद्योग फिल्म इंडस्ट्री खूप मोठी आहे. इतक्या दशकापासून आहे. खूप मोठी परंपरा आहे, पण  तसेच भारतीय मनोरंजक क्षेत्राला जागतिक पातळीवर नेण्यासाठी अशा परिषदेची गरज होती. त्यामुळे अशा परिषदेतून उत्तम उत्तम कलाकार, सृजनशील कलाकार, तंत्रज्ञ निर्माण होतील, असे अल्लू अर्जुन म्हणाला.


About Author

Astha Sutar

Other Latest News