Civil Defence Mock Drill – काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमावावा लागला होता. तर यामध्ये सहा पर्यटकांचा महाराष्ट्रातील समावेश आहे. या हल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेले असून, हा हल्ला पाक पुरस्कृत असल्याचे समजले जाते. यानंतर आता भारताने पाकला धडा शिकवला पाहिजे, अशी भावना जनसामान्यांची आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भारताकडून पाकिस्तानवर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत…, युद्धकालीन परिस्थितीत सामान्य नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत आज देशासह राज्यात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे.

मुंबई, ठाण्यात मॉक ड्रिल कुठे?
दुसरीकडे आज मुंबईसह ठाण्यातही मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालय आदी ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत किंवा युद्धकालीन परिस्थितीत नागरिकांना कसे सुरक्षित ठेवावे… किंवा सुरक्षित स्थळी पोहोचावे यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईत दादर, येथे सकाळी नऊ वाजता मॉक ड्रिल असणार आहे. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी 2008 साठी दहशतवादी हल्ला झाला होता, त्या सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर सकाळी 11 वाजता मॉक ड्रिल असणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील क्रॉस मैदान येथे दुपारी साडेतीन वाजता मॉक ड्रिल असणार आहे. तर ठाण्यातही दुपारी मॉक ड्रिल होणार आहे.
मॉक ड्रिल म्हणजे काय?
युद्धाकालीन परिस्थितीमध्ये किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांनी कशी काळजी घ्यावी… याबाबत सिव्हिल डेफन्सकडून नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येते. पूरपरिस्थिती, आणीबाणी, युद्धाकालीन परिस्थितीमध्ये किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये लोकांनी काय केले पाहिजे, कसे राहिले पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, खबरदारी आणि सावधान राहिले पाहिजे. या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय कीट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. याला मॉक ड्रिल असे म्हणतात.