महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना विभागाने विविध मागण्यांसाठी पुकारला बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचारी भरती तात्काळ करणे, खाजगीकरण बंद करणे, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे, तांत्रिक वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांवरती होणाऱ्या कारवाया, अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनी बेमुद संप पुकारला आहे. याच्या शेती आणि जमीनीशी संबंधित कागदोपत्री व्यवहारांवर मोठा परीणाम होणार आहे.
संपाची कारणे काय?
भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे, त्यामुळे पुण्यातील भूमी अभिलेख कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. सुमारे 2000 रिक्त पदांवर काम करणारे कर्मचारीही संपात सहभागी आहेत, ज्यामुळे दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. संपाचे मुख्य कारण म्हणजे तांत्रिक वेतनश्रेणीचा मुद्दा, ज्यामध्ये सरकारकडून होणारा विलंब आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. अनेक कामगारांना पगार आणि नोकरीच्या परिस्थितीशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि ते मालकी योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाशी संबंधित कामांनाही विरोध करत आहेत.

संपामुळे पुणे विभागातील भूमी अभिलेख विभागाचे काम विस्कळीत झाले आहे आणि अनेक कार्यालये रिकामी आहेत. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप सुरू ठेवण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे कामावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.
भूमी अभिलेखच्या कामांवर परिणाम
भूमी अभिलेख विभाग हे शासकीय यंत्रणा असून, तो राज्यातील जमिनींचे नोंदणी, मोजणी व व्यवस्थापन यासाठी कार्यरत असतो. या विभागाचे मुख्य कार्य म्हणजे ७/१२ उतारा, ८अ उतारा, फेरफार नोंदणी, जमिनीचे वर्गीकरण, भूमापन आणि डिजिटल नोंदी ठेवणे. शेतकऱ्यांना कर्ज, अनुदान, पीक विमा यासाठी आवश्यक कागदपत्रे हे विभाग प्रदान करतो. यामुळे जमिनीशी संबंधित वाद कमी होतात आणि कायदेशीर प्रक्रिया पारदर्शक बनते. ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत भूमी अभिलेख विभागाने अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना जलद व सोप्या पद्धतीने माहिती मिळते. हा विभाग ग्रामीण आणि शहरी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आता या संपामुळे कामांवर मोठा परिणाम होणार आहे.