युध्द थांबले; तरी इराणला इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादची भीती!

इस्रायलच्या शत्रुंच्या यादीत इराण सर्वात वरच्या स्थानावर आहे. इस्रायलकडून इराणवर आता बॉम्बफेक होणार नाही. पण त्यांच्यावर नजर ठेवण्याच अभियान थांबणार नाही. त्यामुळे मोसादची भीती इराणच्या मनात कायम आहे.

मोसादच इराणमधील नेटवर्क शोधण्यासाठी इराणची गुप्तचर यंत्रणा वाजाने पूर्ण ताकद लावली आहे. अटक सत्र सुरु आहे. इराणमध्ये आतापर्यंत जवळपास 700 जणांना अटक झाली आहे. तिघांना फाशी देण्यात आली आहे. इराणमध्ये युद्धाविरामानंतर जोरात छापेमारी सुरु आहे. इराणमधून जे रिपोर्ट येत आहेत, त्यानुसार मोसादशी संबंधित लोकांना पकडल्यानंतर अनेक पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे युध्दविरामानंतर देखील इराण-इस्रायल संघर्ष सुरूच आहे.त्यात इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसादची भीती इराणला सातत्याने आहे. कारण ही संस्था अनेक गुप्त ऑपरेशन राबवत असते.

मोसादकडून इराणचे मोठे नुकसान

इराण-इस्रायल युद्ध आता थांबलं आहे. पण इस्रायलच्या शत्रुंच्या यादीत इराण सर्वात वरच्या स्थानावर आहे. इस्रायलकडून इराणवर आता बॉम्बफेक होणार नाही. पण त्यांच्यावर नजर ठेवण्याच अभियान थांबणार नाही. इस्रायलची गुप्त मिशन इराणमध्ये सुरु राहतील. मोसादच्या प्रमुखाने याची घोषणा करताना इराणला खुलं आव्हान दिलय. नुकत्याच संपलेल्या युद्धात मोसादमुळेच इस्रायल प्रत्येक आघाडीवर इराणच्या दोन पावलं पुढे होता, असं मोसाद चीफने सांगितलं. आपल्या देशात मोसादच इतकं मजबूत नेटवर्क आहे, याचा इराणला अंदाजही नव्हता. इराणच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले झाल्यानंतर सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेईला मोठा धक्का बसला. अचानक सीनियर कमांडर्स मारले गेले. वैज्ञानिकांची हत्या झाली.

अंतर्गत छुपे युद्ध अद्याप सुरूच

इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि अमेरिकेच्या सीआयए विरोधात अभियान सुरु असल्याचा इराणने दावा केलाय. हे युद्ध अजूनही सुरु आहे आणि भविष्यातही सुरु राहील. कारण युद्धविरामानंतर मोसाद आणि इराणच्या गुप्तचर संस्थेमध्ये लढाई सुरुच आहे. मोसादचे हेड डेविड बर्निया यांनी आपल्या टीमच कौतुक केलं. इराणमधील ऑपरेशनच यश अकल्पनीय असल्याच त्यांनी सांगितलं. त्यामुळे गुप्तचर संस्थांच्या कारवाईची भीती अद्याप इराणला आहे, हे यावरून स्पष्ट होते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News