कढीपत्त्याचे झाड सुकत चालले आहे का? ‘हे’ उपाय करून पाहा

आजआम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या वाढीसाठी काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही कढीपत्त्याचे रोप कमी वेळात हिरवे आणि दाट बनवू शकता.

कढीपत्ता हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण तुमच्या लक्षात आले आहे का की कधीकधी त्याच्या झाडाला नवीन पाने येत नाहीत? कधीकधी झाडाची मुळे किंवा माती नसल्याने असे घडते. कढीपत्त्याची वाढ थांबण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की जमिनीत पोषणाचा अभाव, योग्य प्रमाणात पाणी न मिळणे किंवा मुळांमध्ये संसर्ग होणे. आज आम्ही तुम्हाला खास घरगुती उपाय सांगणार आहोत काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही कढीपत्याच्या झाडाची झपाट्याने वाढ करू शकता.

पाण्याचे योग्य प्रमाण

कढीपत्त्याचे झाड सुकत चालले असेल, तर त्याला पुरेसे पाणी मिळत आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. कढीपत्त्याला जास्त पाणी किंवा कमी पाणी दोन्ही हानिकारक असू शकते. जर तुम्ही जास्त पाणी देत असाल, तर मुळे कुजण्याची शक्यता असते. त्यामुळे पाने पिवळी होऊन गळून पडू शकतात. जर तुम्ही कमी पाणी देत असाल, तर पाने सुकून, पिवळी होऊन गळून पडू शकतात. माती कोरडी झाली की नाही हे तपासा. जर माती कोरडी वाटत असेल, तर पाणी द्या.

सूर्यप्रकाश

कढीपत्त्याचे झाड सुकत चालले असेल, तर त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. कढीपत्त्याला दिवसातून 5-6 तास सूर्यप्रकाश आवश्यक असतो. जर सूर्यप्रकाश कमी मिळत असेल, तर ते सुकू शकते. झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.

खत

कढीपत्त्याचे झाड सुकत चालले असेल, तर त्याला नियमित खत देणे आवश्यक आहे. खत दिल्याने झाडाला आवश्यक पोषक तत्वे मिळतील आणि त्याची वाढ चांगली होईल. झाडाला नियमित खत द्या. शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत हे कढीपत्त्यासाठी चांगले पर्याय आहेत. ताक, आंबट दही किंवा भाताचे पाणी देखील कढीपत्त्यासाठी खत म्हणून वापरले जाऊ शकते. जास्त खत दिल्यास झाडाचे नुकसान होऊ शकते. खत थेट झाडाच्या मुळाशी न देता मातीमध्ये मिसळा. खत दिल्यानंतर झाडाला नियमित पाणी द्या. 

रोग किंवा कीड नियंत्रण

रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास योग्य उपाययोजना करा. कडुलिंबाच्या तेलाचा फवारा मारल्याने किडींपासून संरक्षण होते. कीटकनाशक साबणाचा फवारा देखील उपयोगी आहे.

 छाटणी

अनावश्यक फांद्या आणि पाने वेळोवेळी काढा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News