सौदी अरेबियाने घातली भारत,पाकिस्तानच्या व्हिसावर बंदी, नेमके कारण काय?

सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेत भारत पाकिस्तानसह जगभरातील तब्बल 14 देशांच्या व्हिसावर तात्पुरती बंदी घातली आहे. सौदी सरकारची ही व्हिसा बंदी व्यावसायिक, कौटुंबीक व्हिजासह उमराह व्हिजावर देखील लागू असणार आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानच्या विजावर बंदी घातली आहे. यासाठी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी पुढाकार घेतला आहे

हज यात्रेला लाखो मुस्लिम श्रद्धाळू सहभागी होत असतात. यामध्ये अनधिकृतपणे विनानोंद करणाऱ्यांचा देखील समावेश असतो. त्यामुळे हजला येणाऱ्यांची संख्या वाढते. गेल्या वर्षी हजमध्ये झालेल्या दुर्घटनेत तब्बल1 हजार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अनधिकृतपणे हजला येणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ही बंदी हज पूर्ण होई पर्यंतमध्ये म्हणजे जून महिन्यापर्यंत लागू असणार आहे.

१३ एप्रिलपर्यंत मिळणार उमराह व्हिजा

सौदी अरबच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की यंदा उमराह करण्यासाठी १३ एप्रिलपर्यंत व्हिजासाठी अर्ज केला जाऊ शकतो. 13 एप्रिलनंतर हा उमराहसाठी दिला जाणार व्हिजा थांबण्यात येणार आहे.

व्हिजा बंदी घातलेले देश कोणते?

सौदी अरबने तात्पुरती व्हिसा बंदी घातलेल्या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इजिप्त, इंडोनेशिया, नायजेरिया, इराक, जॉर्डन, सूदान, इथियोपिया, अल्जेरिया, ट्यूनेशिया और येमेन या देशांचा समावेश आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, प्रवासाचे नियम सोपे करण्यासाठी ही तात्पुरती व्हिसा बंदी आहे. यामुळे हजदरम्यान यात्रेकरूंच्या सुरक्षिततेत सुधारणा होईल आणि यात्रेकरूंचा प्रवास आरामदायी होईल.

उमराह म्हणजे काय?

मुस्लिम यात्रेकरू मक्का येथे जाऊन उमराह करतात. उमराह म्हणजे मक्का येथे जाऊन पवित्र काबाची प्रदक्षिणा (करणे, सफा आणि मारवा दरम्यान सई करणे आणि मुंडण करणे यासारखे विधी केले जातात. इस्लाममध्ये हजयात्रा करून उमराह करणे पवित्र मानले जाते.


About Author

Astha Sutar

Other Latest News