कर्नाटकमधील गोकर्णच्या घनदाट जंगलात गुहेत रशियन महिलेचे वास्तव्य; सोबत दोन मुले, प्रकरण काय?

नैसर्गिक तयार झालेल्या या गुहेत रशियन महिला नीना दोन मुलांसह राहत असल्याचे आढळले. पोलीस दाखल होताच सुरुवातीला नीनाने कुठलीही ओळख दाखवण्यास नकार दिला.

कर्नाटकमधील गोकर्ण हा परिसर घनदाट जंगलासाठी ओळखला जातो. या ठिकाणी घनदाट जंगलातील एका गुहेत रशियन महिला आढळूनआली. कर्नाटकमध्ये पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ही रशियन महिला दोन मुलींसह आढळली. याबाबत सध्या आश्चर्य व्यक्त केले जात असून सध्या या प्रकरणी तपास देखील सुरू आहे.

गोकर्णच्या जंगलात नेमकं काय घडलं?

गोकर्ण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीधर एसआर आणि त्यांची एक टीम पर्यटक सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी रामतीर्थ डोंगरावर गस्त घालत होते. यावेळी त्यांना एका अतिशय धोकादायक अशा ठिकाणी गुहेत काही हालचाली दिसल्या. यानंतर एका नैसर्गिक तयार झालेल्या या गुहेत नीना दो मुलांसह राहत असल्याचे आढळले. पोलीस दाखल होताच सुरुवातीला नीनाने कुठलीही ओळख दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर महिला बालकल्याण विभागातील एका महिलेला बोलावून नीनाला बोलतं करण्यात आलं. यानंतर नीनाने सगळी माहिती सांगितली.

रशियन महिलेने गुहेत एक घरही तयार केल्याचं समोर आलं. या रशियन महिलेचा 2017 सालीच संपलाय भारतातला व्हिसा संपल्याचे आढळून आलं. त्यामुळे ही रशियन महिला भारतात किती काळ राहत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

महिला नेमकी कोण, प्रकरण काय?

सदर रशियन महिलेचे नाव नीना कुटिना असे असून ती 40 वर्षांची आहे. तिला दोन मुली असून एका मुलीचे वय 6, तर दुसऱ्या मुलीचे वय साधारण 4 वर्षे इतके आहे. 9 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान, या तिघांची पोलिसांनी गुहेतून सुटका केली व सुरक्षितपणे गुहेतून खाली आणण्यात आले. 2017 साली नीना गोव्यात आली होती. त्यानंतर ती कर्नाटकमधील गोकर्ण गावात पोहचली. अध्यात्मिक आयुष्याची ओढ वाटू लागल्याने तिने या गोकर्णमधील घनदाट जंगलात वास्तव्य करण्यास सुरुवात केली.

निनाने इतके दिवस जंगलात कसे वास्तव्य केले ? अन्न-पाण्याची तिने काय सोय केली? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित राहत आहेत. पुढे याबाबत आणखी माहिती समोर येईल अशी आशा आहे. पोलीसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून पूर्ण तपासाअंती तिला रशियाला पुन्हा पाठवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News