दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅक्शन मोडवर आहेत. आधी सिंधू जल करार स्थगिती करण्यात आला तसेच पाकिस्तानच्या व्यापारावर निर्बंध घालण्यात आले. आत्ता आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात येणार आहे. आज( मंगळवारी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी उच्चस्तरीय बैठक बोलण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, सीडीएस जनरला अनिल चौहान यांच्यासह तीनही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत. या बैठकीत भारताची आगामी रणनीती ठरवण्याची शक्यता आहे. तसेच सैन्याच्या तयारीचा आढावा देखील घेतल्या जात असल्याची चर्चा आहे.

जम्मू-काश्मीरमधील 48 पर्यटनस्थळ बंद
पहलगाम हल्लानंतर मोठा निर्णय घेत जम्मू काश्मीरमधील तब्बल 48 पर्यटनस्थळ बंद करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून सुरक्षेचे कारण देत 80 पैकी 48 पर्यटनस्थळ बंद करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी कॅबिनेटची बैठक सुद्धा बोलवली होती. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची असली तरी राज्य सरकार देखील या हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याची कबुली ओमर अब्दुला यांनी दिली.
बुधवारी केंद्रीय कॅबिनेटची बैठक
बुधवारी (ता.30) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. पहलगाम आंतकवादी हल्ल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक असेल. त्यामुळे पाकिस्तानवर कारवाई संदर्भात महत्त्वाचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकाकडून 50 लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. तसेच आवश्यकता असेल तर पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे देखील जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील सहा व्यक्तींचा पहलागमधील आंतकवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.