दिल्ली : भगवान श्रीरामांच्या दर्शनासाठी आयोध्येला जाण्यासाठी खास क्षणाची वाट पाहत असाल तर तो आला आहे. कारण तुम्ही कुटुंबीय किंवा मित्रांसह अयोध्येतील रामलल्लांचे दर्शन घ्यायला अगदी किफायतशीर दरामध्ये जाऊ शकतो. भारतीय रेल्वेची सहाय्यक कंपनी आयआरसीटीसी रामभक्तांसाठी एक किफायतशीर पॅकेज आणले आहे. ही ट्रेन टूर पॅकेज नवी दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल येथून सुरू होईल आणि यात भाविकांना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करता येईल.
आयआरसीटीसी ने ट्विटरद्वारे या पॅकेजची माहिती दिली आहे. या पॅकेजमध्ये एक रात्र आणि दोन दिवसांच्या रामलल्ला दर्शन टूर पॅकेजमध्ये भाविकांना चेअर कार कोचमध्ये प्रवास करता येईल. यात प्रवाशांसाठी जेवण व निवासाची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवासादरम्यान प्रवासी सरयू घाट, राम मंदिर, हनुमान गढी आणि कनक भवन अशा ठिकाणांचे दर्शन घेऊ शकतील.

पॅकेजचे दर
टूर पॅकेजचा खर्च प्रवाशांनी निवडलेल्या ऑक्युपन्सीनुसार ठरवला जाईल. पॅकेजची सुरुवात प्रति व्यक्ती 9 हजार 510 पासून आबे. ट्रिपल ऑक्युपन्सीमध्ये प्रति व्यक्ती 9 हजार 510 लागतील. डबल ऑक्युपन्सीमध्ये प्रति व्यक्ती 11 हजार 040 रुपये भरावे लागतील. सिंगल ऑक्युपन्सीमध्ये प्रति व्यक्ती 16 हजार 20 खर्च येईल. या टूर पॅकेजसाठी बुकिंग irctctourism.com या वेबसाईटवर करता येईल.
… आधी जावे लागेल दिल्लीला
आयआरसीटीसी रामभक्तांसाठी घोषित केलेले खास पॅकेजची सुरुवात ही दिल्लीतून होणार आहे. वंदे भारत ट्रेनही आनंद विहार टर्मिनल येथून सुटेल. त्यामुळे महाराष्ट्रातील भक्तांना या पॅकेजमधून प्रवास करण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्ली गाठावी लागेल आणि तेथून पुढे या पॅकेजचा फायदा घेत आयोध्येमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी जात येईल.