Yogesh kadam : आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त खेड येथील तहसीलदार कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सामाजिक व प्रशासकीय प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करायचे आहे असे शासकीय अधिकाऱ्यांना आवाहन केले असून, त्यांनी तेथील सर्व उपस्थितितांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पोलीस ठाण्यातील आढावा…
दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी खेड येथील स्थानिक पोलीस ठाण्याला भेट दिली या भेटीदरम्यान पोलीस ठाण्यातील विविध भागांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे सायबर कक्ष आणि स्वच्छता व्यवस्थेची त्यांनी सखोल पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत कार्यप्रणाली नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा तक्रारीचे निवाकरण यावर चर्चा केली.
स्वच्छता व्यवस्थेवर विशेष पाहणी केली…
राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या दौऱ्यानंतर स्थानिक प्रशासनाला चालना मिळाली असून नागरिकांच्या सुरक्षा प्रती शासनाची कटिबद्धता त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. वाढत्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर या विभागाचे कार्यक्षमतेवर विशेष भर दिला. तसेच पोलीस स्टेशनच्या परिसरातील स्वच्छता आणि व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केलं तर काही सुधारणा करण्याबाबत पोलीस ठाण्याला सूचना दिल्या आहेत.