“कोणाच्या विरोधात द्वेष नको, आम्हाला शांती हवी आहे”, पहलगाम हल्ल्यात शहीद विनय नरवाल यांच्या पत्नीचे भावनिक आवाहन

हरियाणा :  पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या आंतकवादी हल्ल्यामध्ये नौसेनेतील लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. विनय हे आपल्या पत्नीसोबत पहलगामध्ये फिरण्यासाठी आले होते. अवघ्या सहाच दिवसांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतपाची लाट उसळली आहे. शहीद विनय नरवाल यांच्या पत्नी हेमांशी यांनी म्हटले आहे की, ज्यांनी त्यांच्या पतीची हत्या केली त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. पण त्यासाठी मुस्लिम आणि काश्मिरी लोकांना
टार्गेट करू नये.

पत्रकारांशी बोलताना हिमांशी म्हणाल्या की, त्यांना कोणत्याही समुदायाविरुद्ध द्वेष नको आहे. या घटनेमुळे लोक काश्मिरी आणि मुस्लिम लोकांना टार्गेट करत द्वेष व्यक्त करत आहेत. ते आम्हाला नको आहे. आम्हाला शांती हवी आहे. त्या म्हणाल्या की आम्हाला न्याय हवा आहे. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

विनय-हेमांशी यांचा तो फोटो व्हायरल

पहलगामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांनी गोळ्या घालून विनय नरवाल यांची हत्या केली. नरवाल यांच्या मृतदेहपाशी हेमांशी या बसल्या होत्या. त्या आपल्या पतीला उडवण्याचा प्रयत्न करत होत्या. तो व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून लोकांनी हल्ल्याविरोधात चीज व्यक्त केली होती.

विनय यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

विनय आणि हिमांशी यांच्या लग्नाला आठवडा देखील झालेला नसताना विनय यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. विनय यांचा 27 वा वाढदिवसा निमित्त आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हरियाणातील करनाल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नौसेनेच्या अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहताना नरवाल यांच्या आई आणि पत्नी हिमांशी यांचे अश्रू अनावर झाले होते.

वेचून-वेचून आंतकवाद्यांना मारणार

गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील एका जाहीर कार्यक्रमातून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचे म्हटले. तसेच हा नरेंद्र मोदींचा भारत आहे एका एका वेचून वेचून मारू, असा इशारा शहा यांन दिला. तसेच जगातील सगळे देश भारतासोबत आहे. दहशतवाद संपवण्याचा संकल्प भारत पूर्ण करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News