मुंबई : राजस्थान राॅयल्स विरूद्धच्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या रोहित शर्माच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद झाली. एकाच संघाकडून खेळताचा सहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित हा दुसरा फलंदाज ठरला. एकाच संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने बंगळुरु संघाकडून खेळताना 8871 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने आज राजस्थान विरुद्ध जोरदार फटके बाजी केली. त्याने अवघ्या 36 बाॅल्समध्ये 53 धावा फटकवल्या. त्याच्या या शानदार बॅटींगमुळे मुंबईच्या संघाने 200 चा टप्पा ओलांडू शकली. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात रोहित शर्मा हा फाॅर्ममध्ये दिसत नव्हता. मात्र मागील चार सामन्यांमध्ये आक्रमक खेळी करत आपण फाॅर्म आले असल्याचे त्याने दाखवून दिले.

मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
रोहित शर्माने आज मुंबई संघाकडून खेळताना सर्वाधिक 6000 हजार धावा करण्याचा विक्रम केला. रोहितनंतर मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरमध्ये पोलार्डचा नंबर लागतो त्याने मुंबई इंडियन्सकडून 3915 धावा केल्या आहेत. तर, सूर्यकुमार यादवने 3468 धावा केल्या आहेत. त्यानंतर अंबाती रायडूचा नंबर लागतो त्याने 2635 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरने 2599 धावा केल्या आहेत.
डेक्कन चार्जर्ससाठी 1170 धावा
रोहित शर्मा हा दहावर्षांपेक्षा अधिक काळापासून मुंबईकडून खेळतो आहे. त्यापूर्वी तो डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता. विशेष म्हणजे आयपीएल जिंकणाऱ्या डेक्कनच्या संघाचा तो भाग होता. अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जर्सने आयपीएल जिंकली होती. रोहित डेक्कन चार्जर्सकडून 45 सामने खेळताना 1170 धावा केल्या आहेत.विशेष म्हणजे एक हॅटट्रीक देखील त्याच्या नावावर आहे. सुरुवातीच्या तीन हंगाम तो डेक्कन चार्जर्सकडून खेळला.