India Pakistan war! भारताचा पाकिस्तानवर Water Attack, सलाल धरणातून चिनाब नदीत पाणी सोडले, पाकिस्तानमध्ये पूरस्थितीची शक्यता

भारताने सलाल धरणांचे सर्व दरवाजे एकाच वेळी उघडल्यामुळं पाकिस्तानमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणात  पाणी सोडले गेले आहे. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. आता भारताने पाकिस्तानला दुहेरी दणका दिला आहे.

Water Attack : भारताने ऑपरेशन सेंदूर करत हल्ल्याचे पाकिस्तानला जशास तसे प्रतिउत्तर दिले. गुरुवारी रात्री पाकिस्तानीने हवाई हल्ले केले. याला भारताने पाकचे हल्ले उधळून लावले. भारताने पाकिस्तानमधील ११ शहरांवर हल्ला केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पाकिस्तान पुरता घाबरला आहे. चार बाजूंनी पाकची कोंडी केली जात असताना, आता भारताने पाकवर Water Attack केला आहे. परिणामी पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

सलाल धरणाचे दरवाजे उघडले…

दरम्यान, काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर भारताने पहिल्यांदा सिंधू पाणी करार स्थगित करत पाकिस्तानचे पाणी रोखले आणि कोंडी केली. त्यानंतर आता भारताने सलाल धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. त्यामुळं एकिकडे तोफगोळे, हवाई हल्ले हे सुरु असताना, भारताने सलाल धरणांचे सर्व दरवाजे एकाच वेळी उघडल्यामुळं पाकिस्तानमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणात  पाणी सोडले गेले आहे. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. आता भारताने पाकिस्तानला दुहेरी दणका दिला आहे, त्यामुळं पाकिस्तानची चार बाजूनी कोंडी झाली आहे.

भारताचा पाकिस्तानवर वाटर स्ट्राईक…

दुसरीकडे गेल्या दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे सलाल आणि बागलिहार या धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने हवाई हल्ले केले. मात्र याला भारताने सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. रात्रभर पाकिस्तानला भाजून काढले आहे. यानंतर भारताने पाकला दुहेरी दणका दिला आहे. चिनाब नदीवर बनलेल्या सलाल आणि बगलीहार धरणांवरील सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. सलाल आणि बागलिहार धरणाचे दरवाजेही उघडण्यात आल्यामुळं दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेय. यामुळं पाकिस्तानमध्ये पाणी जाणार आहे, त्यामुळं पाकिस्तानमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. भारताने एकप्रकारे पाकिस्तानवर वाटर स्ट्राईक केला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News