आतापर्यंत भारतीयांना दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवावे लागत होते. त्यासाठी जवळपास 4.66 कोटी रुपये खर्च करावे लागत होते. पण आता युएई च्या नव्या नियमानुसार, फक्त 23.30 लाख रुपये भरून तुम्ही युएई चा गोल्डन व्हिसा मिळवू शकता आणि तिथे कायमस्वरूपी राहू शकता. नेमका युएईचा हा काय निर्णय आहे, ते समजून घेऊ…
गोल्डन व्हिसा योजना नेमकी काय?
संयुक्त अरब अमिरातने भारतीय नागरिकांसाठी एक खास योजना घेऊन आले आहे. या योजनेचं नाव आहे ‘गोल्डन व्हिसा’. आता भारतीय नागरिक फक्त नॉमिनेशनच्या आधारावर गोल्डन व्हिसा मिळवू शकतात. गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी 23.3 लाख रुपये म्हणजेच 1 लाख दिरहम फी भरावी लागेल. ही फी भरल्यानंतर, तुम्हाला युएई मध्ये कोणतीही प्रॉपर्टी किंवा व्यवसाय (ट्रेड लायसन्स किंवा मालमत्ता खरेदी न करता) न करताही कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळेल.

भारतीय नागरिकांना होणार लाभ
युएई सरकारची ही योजना गुंतवणुकीवर आधारित असलेल्या जुन्या पद्धतीत बदल आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की, ज्या लोकांचं कला, व्यापार, विज्ञान आणि फायनान्समध्ये योगदान आहे, त्यांना युएई मध्ये आकर्षित करायचं. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांना याचा फायदा होईल. सुरुवातीच्या तीन महिन्यांतच 5,000 पेक्षा जास्त भारतीय नागरिकांना गोल्डन व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात हा निर्णय भारतीयांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
गोल्डन व्हिसा कसा मिळवायचा?
भारतात, रायद ग्रुप कन्सल्टन्सीला गोल्डन व्हिसासाठी नामांकन देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रायद ग्रुपचे प्रमुख रायद कमाल अयूब म्हणाले, “भारतीयांसाठी युएई चा गोल्डन व्हिसा मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे.”गोल्डन व्हिसा कसा मिळेल याबद्दल रायद कमाल यांनी माहिती दिली. त्यामुळे सुरूवातीला ही योजना बांगलादेश आणि भारतीय नागरिकांसाठी असणार आहे.