Railway New Rules – सध्या उन्हाळ्याची सुट्टी पडल्याने अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखत असतात. यासाठी कित्येकजण रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. यासाठी कित्येक दिवस तिकिट आधी बुक केले जाते. मात्र जर तुम्ही रेल्वेन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण रेल्वेने नवीन नियम जारी केले आहेत. हे जर तुम्हाला नियम माहित नसेल तर तुम्हाला दंड देखील होऊ शकतो.
काय आहेत नवीन नियम?
दरम्यान, 1 मे 2025 पासून रेल्वेन नवीन नियम जारी केले आहे. जर तुम्ही तिकिट बुक केले आहे. आणि तुमचे तिकिट वेटींगमध्ये आहे, तर तुम्हला रिझर्व कोच बसण्यास मनाई आहे. तर तुम्ही फक्त जनरल डब्ब्यातच बसू शकता. तसेच तुमच्याकडे जनरलचे तिकिट आहे, पण सीटचा नंबर न पाहता काही प्रवाशी स्लीपर कोच आणि एसी कोचमध्ये जाऊन बसतात. पण आता ते तिकिटाचा नंबर पडताळणी करण्याआधी बसू शकत नाहीत. असे प्रवाशी आढळल्यास त्यांना दंड होऊ शकतो. 1 में 2025 पासून रेल्वेन नवीन नियम जारी केले आहेत. या वरील नियम नमूद करण्यात आले आहेत.

किती आहे दंड ?
दुसरीकडे 1 मे 2025 पासून रेल्वेन नवीन नियमानुसार जर प्रवाशांनी रेल्वेच्या या नवीन नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना पैशांच्या स्वरुपात दंड ठोठावण्यात येईल, दरम्यान, वेटींग तिकिट असलेल्या प्रवाशाने जर आरक्षित कोचमध्ये बसल्यास त्याला दंड होऊ शकतो. तसेच वातानुकूलित कोचमध्ये विना आरक्षित असलेला प्रवासी आढळल्यासा त्याला 440 रुपये दंड होऊ शकतो. तसेच जनरल तिकिट असलेले प्रवाशी जर स्लीपर कोचमध्ये दिसल्यास त्याला 250रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे रेल्वेनं नवीन नियमात सांगितले आहे.