Lek Ladaki Yojana : लाडकी बहीण योजनेच्या आधी लेक लाडकी योजना सरकारने आणली होती. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे आणि स्त्री भ्रूण हत्येला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लेक लाडकी योजना अंमलात आणली. मुलीच्या जन्मापासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सरकारने म्हटले. शासनाच्या निकषानुसार मुलीच्या जन्मानंतर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे ७९ कोटी ३२ लाख ६० हजार रुपये बँक खात्यात जमा झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. पण या योजनेत आता पर्यंत किती जणांना याचा लाभ मिळाला आहे. यावर आपण नजर टाकूया…
कोणत्या मुलींना लाभ?
दरम्यान, जिल्हास्तरावर योजनेची ठोस अंमलबजावणी केली जात असून एप्रिल २०२४ ते मे २०२५ पर्यंत १ लाख ५८ हजार ६५२ मुलींना योजनेचा लाभ मिळाला आहे. पिवळ्या आणि केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य राज्य सरकारकडून देण्यात येते. महिला बाल विकास विभागाच्यावतीने एप्रिल २०२४ मध्ये ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली. मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षे होईपर्यंत एक लाख एक हजार रुपयांची रक्कम खात्यात वर्ग करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

लेक लाडकी योजनेचे लाभार्थी…
गोंदिया – ४५९७
हिंगोली – २५७८
जळगाव – ६९८८
जालना – ३३२४
कोल्हापूर – ८२६९
लातूर – ४१९४
मुंबई शहर – १००
मुंबई उपनगर – ११४०
नागपूर – ६४१४
नांदेड – २५८८
नंदुरबार – ३०५१
नाशिक – १०,११८
धाराशिव – ३,८८८
अहमदनगर – ७,७१३
अकोला – ३,६८१
अमरावती -७९८१
संभाजीनगर – २६०१
बीड – ३०६६
भंडारा – ४०६५
बुलढाणा – ६२१५
चंद्रपूर – ३८३९
धुळे – २६७१
गडचिरोली – २६२४
पालघर – ४६७९
परभणी – २८५१
पुणे – ७०११
रायगड – ४२६५
रत्नागिरी – २०४६
सांगली – ३०४०
सातारा – ६३७७
सिंधुदुर्ग – १०९७
सोलापूर – ८४०६
ठाणे – ४१४१
वर्धा – ३५२६
वाशिम – ४०४६
यवतमाळ – ५४६२
एकूण – १,५८,६५२