अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी

शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हे रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. पण शेतकरी मेला काय तरी फरक पडत नाही. अशी टिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.

Vijay wadittiwar – राज्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागातील शेतकरी यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, या शेती पिंकाचे झालेले नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी याला जोर धरत आहे.

नुकसान भरपाई कधी देणार?

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आठ लोकांचा वाघबळी गेला आहे.. शेतकरी आणि शेतमजूर नुकसान झाले आहे, शेती करणे कठीण झाले आहे. शेतीच्या बाजूला जे जंगल आहे तिथे कुंपण घालावे ही मागणी केली पण सरकार लक्ष देत नाही. पालकमंत्री आणि वनमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हे रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. पण शेतकरी मेला काय तरी फरक पडत नाही. अशी टिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.

शेतकरी मदत कधी होणार

दुसरीकदे राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हे सरकार मोठे रस्ते बांधणे इतकेच काम करत आहे. शेतकरी कर्जमाफी केली नाही. शेतकरी अडचणीत आले आहे. धान, फळबागा, केळी नुकसान झाले अजून, पंचनामे करण्याचा आदेश निघाला नाही, नुकसान भरपाई कधी देणार? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. निवडणुकीत आम्ही लाडकी बहीण योजनेत पैसे वाढवून देतो असे सरकारने म्हटले होते. पण हे सरकार केवळ आश्वासन देत आहे. सरकारने तात्काळ शेतकरी कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News