Smart Phone – सध्या सोशल मीडियाचे युग आहे. पूर्वी अन्न, वस्त्र आणि निवारा असे बोलले जायचे. पण आधुनिक आणि सोशल मीडियाच्या युगात अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण आताच्या काळात प्रत्येकाकडे स्मार्ट मोबईल दिसतो. या स्मार्ट मोबाईलच्या कव्हरच्या मागे अनेकजण पैशांची नोट ठेवतात. तसेच काहीजण महत्वाचे कागद किंवा अन्य कागद ठेवत असतात. पण जर तुम्हीही असे करत असाल तर ही थांबा आणि ही बातमी वाचा… कारण ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
अन्यथा होऊ शकतो स्फोट
दरम्यान, मध्या लहानग्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसतो. या स्मार्ट फोनच्या माध्यमातून जगभरातील माहिती एका क्लिकवर मिळवता येते. मोठमोठे स्मार्ट फोन आहेत. हे स्मार्ट फोन सुंदर दिसण्यामाठी अनेजण मोबाईलला छान कव्हर घालतात. मात्र या मोबाईल कव्हरच्या पाठीमागे 100, 200, 500 रुपयांची नोट ठेवतात. मात्र एका सर्वेनुमार या पैशांचा नोटमुळं मोवाईलच्या पाठीमागील भाग गरम होतो. आणि हा भाग तापल्यामुळं मोबाईलच्या स्फोट होऊ शकतो. असं सर्वेच्या माध्यमातून माहिती समोर येत आहे.

फोन गरम झाल्यामुळे…
दुसरीकडे या आधी ही स्मार्ट मोबाईल गरम झाल्यामुळं स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याला कारण म्हणजे मोबाईलचा अतिवापर किंवा मोबाईंचा सतत वापर झाल्यामुळं मोबाईची बॅटरी गरम होते. आणि बॅटरी गरम झाल्यामुळं मोबाईलचा स्फोट झाला आहे. मोबाईल स्फोट होण्यामागे बॅटरीचा वापर अधिक होत असल्यामुळं झाल असल्याचे जाणकार आणि तज्ज्ञांनी म्हटले आहे. परंतू यासह जर तुम्ही मोबाईल कव्हरच्या पाठीमागे पैशांच्या नोटा ठेवल्या तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. असंही तज्ज्ञांनी आणि जाणकार यांनी म्हटलं आहे.