अहमदाबाद- डार्क टुरिझमकडे सध्या पर्यटकांचा ओढा वाढल्याचं दिसतंय. या स्थळांमध्ये नुकत्याच झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेचीही भर पडलीय. काय आहे डार्क टुरिझम आणि त्याकडे का वाढतोय पर्यटकांचा कल जामून घेऊयात.
अहमदाबादमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या विमान दुर्घटनेत 274 जणांना जीव गमवावा लागला.अहमदाबाद विमानतळाजवळ ज्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ही दुर्घटना घडली. त्या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होतेय.

काय आहे डार्क टुरिझम?
ज्या ठिकाणी अशा दु:खद घटना घडल्या. त्या ठिकाणी भेट देऊन वेदनेची सहवेदना जाणून घेण्याची आणि सहानुभूती देण्याची मानवी प्रवृत्ती यामागे आहे.अशा ठिकाणांना भेटी देण्याला किंवा या पर्यटनाला डार्क टुरिझम म्हणून संबोधलं जातं.
1. मोठी युद्ध, दुर्घटना घडलेल्या स्थळांना भेटी
2. मृत्यू, संहार झालेल्या ठिकाणी भेट देण्याची ओढ
3. दुर्घटनास्थळी पाहणी करुन परिसरात पर्यटन
4. सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठीही भेटी
डार्क टुरिझमची डेस्टिनेशन्स
अहमदाबाद हे काही डार्क टुरिझमचं पहिलं ठिकाण नाही. अशा अनेक ठिकाणी पर्यटक नेहमीच भेटी देत असतात
१. जालियनवाला बाग
२. पानिपत
३. अंदमान कारागृह
४. सुवर्णमंदिर- ऑपरेशन ब्ल्यू स्टार
५. भोपाळ गॅस दुर्घटना स्मारक
६. वायनाड दरडग्रस्त परिसर
अशा ठिकाणांना भेट देण्यामागे भावनिक कारण असतेच त्यासोबत अभ्यास, शिक्षण हाही त्यामागचा हेतू असतो.
डार्क टुरिझममध्ये का होतेय वाढ?
सोशल मीडियावर या दुर्घटनांबाबत होत असलेल्या चर्चांमुळेही या घटनास्थळांना भेट देण्याची इच्छा अनेकांच्या मनात जागृत होते. अशा प्रकारच्या डार्क टुरिझममध्ये जागतिक पातळीसह देशातही वाढ होत असल्याचं सांगण्यात येतंय. अशा डार्क टुरिझममध्ये गेल्या काही काळात सुमारे 10 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय.
सोशल मीडियाचा किती परिणाम ?
सोशल मिडिया आणि इंटरनेटवरही अशा ठिकाणांबाबत होणार चौकशी किंवा सर्च वाढत आहेत.
पर्यटन व्यवसायालाही यामुळं थीम बेस टुरिझम हे नवं दालन खुलं झालंय. मात्र अशा ठिकाणांचं पर्यटन हे जबाबदारीनं आणि संवेदनशीलतेनं व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.