पेनिको- पेरु देशात 3500 वर्षांपूर्वीचं पेनिको नावाचं प्राचीन शहर सापडलंय. या शहरामुळे अमेरिकेच्या प्राचीन कॅरल सभ्यतेबाबत या शहरामुळे नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पेरु देशात बरांका प्राताच्या उत्तरेला पेनिको हे साडे तीन हजार वर्षांपूर्वीचं शहर सापडलंय. हे शहर एका छोट्या टेकडीवर वसलेलं होतं. शहराच्या मध्यभागी गोलाकार बांधकाम असल्याचंही समोर आलंय. या शहरात माती आणि दगडांच्या वस्तूंचे अवशेषही सापडलेले आहेत.

3500 वर्षांपूर्वीचं शहर पेनिको
या शहराच्या शोधामुळे सुमारे ५००० वर्ष जुन्या असलेल्या कॅरल सभ्यतेबाबत नवी माहिती मिळू शकेल असं संशोधकांना वाटतंय.
१. पेरुची राजधानी लीमापासून 200 किलोमीटर उत्तरेला पेनिको शहर
२. समुद्र सपाटीपासून 600 मीटर उंचीवर टेकडीवर वसलं होतं.
3. पेनिको शहर इ.स.पूर्व 1800 ते 1500 या कालखंडात अस्तित्वात
4. सिंधू, मिसर, मेसोपोटेमिया प्राचीन सभ्येतच्या कालखंडातील शहर
5. पेनिको शहर त्या काळातील महत्त्वाचे व्यापार केंद्र
6. प्रशांत महासागर किनाऱ्यावरील नागरिकांसाठी अॅडीज पर्वत आणि अॅमेझॉन खोऱ्यातील दुवा
७. त्या काळी लेखनपद्धती नवसल्यानं संगीत आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीवर भर
7. शहराच्या शोधामुळे कॅरल संस्कृतीची अधिक माहिती मिळणार
8. कॅरल ही अमेरिका खँडातील सर्वात प्राचीन सभ्यता
कॅरल सभ्यतेच्या कालखंडातील सांस्कृतिक जीवन, सामाजिक रचना, व्यापार याबाबत या शहरामुळे अधिकची माहिती मिळू शकणार आहे.
मोहंजडदोशी काय साधर्म्य?
सध्या पाकिस्तानात असलेल्या मोहंजदडो शहराच्या शोधामुळं सिंधू संस्कृतीची अधिक माहिती मिळू शकली होती. इसवीसन पूर्व 2600 ते 1900 या कालखंडात मोहजंदडो शहर अस्तित्वात होतं. नियोजनबद्ध रस्ते, दगडी घरं, जयनियंत्रण, व्यापार, लेखन पद्धती, धातूंचा वापर याची माहिती मोहजंदडो शहरामुळे मिळू शकली होती. आता साडे तीन हजार वर्षांपूर्वीच्या पेनिको शहराच्या शोधामुळे जुन्या संस्कृतीची आणि सभ्यतेची माहिती नव्यानं समोर येईल.
मोहंजदडो काय किंवा पेनिको काय या दोन्ही प्राचीन शहरांच्या शोधामुळे जगाची जुन्या काळाती संस्कृती किती प्रगल्भ होती, याची जाणीव होते. हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर राहत असलेला मानव समाजाशी आपली पाळमुळं किती घट्ट होती, हे यातून जाणवत राहतं.