टक्सन, अमेरिका- मनुष्यांच्या आणि प्राण्यांच्या स्मशानभूमीबाबत तुम्ही एकलं असेल पण कधी विमानांची स्मशानभूमी तुम्ही ऐकली आहे का. अमेरिकेत टक्सन शहराजवळ ही स्मशानभूमि आहे आणि त्यात तब्बल 4000 विमानं सध्या विश्रांती घेतायेत.
शेकडो एकर जागेवर सुमारे 4000 विमानं या ठिकाणी अखेरच्या घटका मोजत आहेत. उड्डाणासाठी अयोग्य झालेल्या विमानांची ही स्मशानभूमी आहे.अमेरिकेच्या एरिझोना राज्यातील टक्सन शहराजवळ शेकडो एकर परिसरात ही विमानं विश्रांती घेतायेत.

विमानाच्या स्मशानभूमीची वैशिष्ट्य
डेव्हिस मंथन एयर फोर्स बेसमध्ये असलेल्या या ठिकाणाचं अधकिृत नाव आहे. एरोस्पेस मेन्टेनन्स अंड रिजनरेशन ग्रुप. या ठिकाणी वर्षानुवर्षापूर्वीची विमाने सध्या विश्रांती घेतायेत. या विमानांचा वापर कधी प्रवासी वाहतुकीसाठी तर कधी युद्धात करण्यात आलाय.
१. अमेरिकन लष्कर, नासा आणि मित्र राष्ट्रांची जुनी विमानं या ठिकाणी
२. ही जागा निवडण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे इथलं हवामान
३. कोरडे, उष्ण वातावरण आणि वर्षभर कमी पावसाचे प्रमाण असल्यानं विमानांना गंज लागत नाही.
४. सपाट आणि कठीण जमिनीमुळे मोठमोठी विमाने उघड्यावरच उभी राहू शकतात
५. विमानांना उतरवण्यासाठी रनवेची गरज लागत नाही.
कशी होते विमानांची देखभाल?
या ठिकाणी असलेल्या विमानांची देखभालही करण्यात येते. काही विमानांची दुरुस्ती करुन त्यांना पुन्हा उड्डाणासाठी योग्य करण्यात येतं.
1. विमान स्टोरेजमध्ये पाठवण्यापूर्वी इंधून काढून घेतलं जातं
2. धुळीपासून वाचण्यासाठी विमान प्लास्टिकनं झाकलं जातं
3. काही विमानं दुरुस्त करुन पुन्हा उड्डाणाच्या योग्य करण्यात येतात
4. काही विमानांचे स्पेअर पार्ट काढण्यात येतात
५. काही विमानांची भंगारात विक्री करण्यात येते
विमानाच्या इतिहासाचं संग्रहालय
दुसऱ्या महायुद्धानंतर विमानांच्या या स्मशानभूमीची निर्मिती झाली. तेव्हापासून लाखो विमानं या ठिकाणी आणण्यात आलीयेत. जगातील सर्वात मोठं विमान साठवण केंद्र अशीही या ठिकाणाची ओळख आहे.
एकाअर्थी हे ठिकाण विमानाच्या इतिहासाचं संग्रहालयच म्हणावं लागेल. या ठिकाणी असलेल्या प्रत्येक विमानाची स्वतंत्र कथा आहे. त्यात युद्ध, प्रवास, संशोधन असं बरचं काही त्यात आहे.