Google Pay Loan : डिजीटल वॉलेट (GPay) अनेक बॅंकांसोबत भागीदारी करून पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे. बॅंक ३०,००० रुपये ते १० लाख रुपयांपर्यंतचा इंस्टंट पर्सनल लोन देत आहेत. लोनची मुदत ६ महिने ते ५ वर्षांपर्यंत असू शकते.
जर तुम्ही गूगल पेच्या माध्यमातून लोन घेण्याची तयारी करत असाल तर काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. जसे, की तुम्हाला किती व्याज भरावे लागेल. तसेच, तुम्ही गूगल पेच्या माध्यमातून लोनसाठी कसा अर्ज करू शकता.

१०.५०% ते १५% पर्यंत व्याज
जर तुम्ही गूगल पेच्या माध्यमातून लोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला १०.५०% ते १५% पर्यंत व्याज भरावे लागू शकते. व्याज दर तुमच्या क्रेडिट स्कोरच्या आधारावर ठरवले जातात.
लोन घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे आणि कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. लोन घेणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा किमान २१ वर्ष असावी लागते. तसेच, नियमित उत्पन्नाचा स्रोत असणे आवश्यक आहे. EMI चा भरणा तुमच्या बँक खात्यापासून काढला जातो.
लोनसाठी अर्ज कसा करावा
- Google Pay अॅप उघडा आणि Money टॅबवर जा.
- Loans सेक्शनमध्ये उपलब्ध ऑफर्स पाहा.
- उपलब्ध ऑफरवर टॅप करा आणि सूचनांचे पालन करा.
- KYC दस्तऐवज अपलोड करा आणि Loan Agreements वर ई-साइन करा.
- लोन मंजुरी नंतर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
कर्ज परतफेडीची प्रक्रिया
Google Pay द्वारे घेतलेल्या कर्जाचा मासिक EMI थेट तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून काढला जाते. त्यामुळे दंड (पेनल्टी) टाळण्यासाठी खात्यात पुरेशी शिल्लक रक्कम असणे अत्यावश्यक आहे. कर्जासाठी अर्ज करतानाच परतफेडीचे संपूर्ण वेळापत्रक म्हणजेच देय तारीख आणि देय रक्कम तुम्हाला आधीच सांगितले जाते.