ED RAIDS IN ILLEGAL BUILDING CASE : राज्यात आणि केंद्रात जेव्हापासून भाजपाचे सरकार आले आहे. तेव्हापासून तपास यंत्रणा अधिक सक्रीय झाल्या आहेत. ईडी, आयकर विभाग, एनआयए आदी तपास यंत्रणाकडून छापेमारी करण्यात येत आहे. दरम्यान, आता वसई-विरारमध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणात सक्तवसुली संचलालयानं (ED) छापेमारी केली. त्यामुळं या भागात व्यायसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
41 अनधिकृत इमारती बाबत ईडीची छापेमारी
दरम्यान, वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम आणि इमारती आहेत. वसई-विरार परिसरातील एकूण 13 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. वसई-विरार परिसरातील पाडण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारती बाबत ईडीची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीमुळे वसई-विरारमधील राजकीय क्षेत्रासह व्यावसायिक आणि वसई-विरार महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

ईडीकडून गुन्हा दाखल…
दुसरीकडे बुधवारी सकाळी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सिताराम गुप्ता यांच्या संतोष भवन येथील घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली. वसई-विरारमधी 41 अनाधिकृत इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळं येथे राहणाऱ्या अडीच हजारापेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. दरम्यान, या छापेमारी प्रकरणात मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयात या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीकडून तपास सुरु असून, जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं ईडीकडून सांगण्यात येतंय.