पिंपळाचे झाड त्याच्या प्रचंड आकारासाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की पिंपळाच्या पानांमध्येही अनेक औषधी गुणधर्म आहेत? पिंपळाच्या पानांचा योग्य वापर केल्यास अनेक आजार दूर होऊ शकतात, तसेच त्वचेसाठी आणि केसांसाठीही ते उपयुक्त आहेत. पिंपळाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. जाणून घ्या पिंपळाच्या पानांचे फायदे…
अस्थमा
दम्याच्या रुग्णांसाठी पिंपळाचे पान खूप फायदेशीर मानले जाते. हे फुफ्फुसांना निरोगी ठेवते. श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. पिंपळाची पाने दम्याच्या रुग्णांना आराम देतात. पिंपळाच्या पानांचा काढा घेतल्याने श्वसन मार्गातील घसा आणि खोकला कमी होतो, ज्यामुळे श्वास घेण्यास सोपे होते. पिंपळाची पाने पाण्यात उकळून त्यांचा काढा तयार करा. हा काढा नियमितपणे प्यायल्याने दम्यावर नियंत्रण ठेवता येते.

मधुमेह
पचन सुधारते
त्वचेसाठी फायदेशीर
पिंपळाची पाने त्वचेसाठी अनेक प्रकारे उपयोगी आहेत. पिंपळाच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते त्वचेच्या समस्यांवर प्रभावी ठरतात. या गुणधर्मांमुळे पिंपळाची पाने त्वचेवरील डाग-ठिपके, पिंपल्स आणि त्वचेच्या इतर समस्यांवर उपाय म्हणून वापरली जातात.
दातांसाठी
पिंपळाची पाने दातांचा पिवळेपणा दूर करतात आणि दुर्गंधी कमी करतात. पिंपळाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. जर तुमचे दात सतत पिवळे पडत असतील किंवा तोंडाला सतत दुर्गंधी येत असेल तर पिंपळाच्या खोडाची साल आणि काळी मिरी हे एकत्र वाटून त्याची पावडर करा. ही पावडर दातांना लावा असं केल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होईल. त्याशिवाय हिरड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
पिंपळाच्या पानांचा अशा प्रकारे वापर करा
- तुम्ही पिंपळाच्या पानांचे सेवन वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. दात आणि त्वचेसाठी तुम्ही पिंपळाच्या पानांपासून बनवलेली पेस्ट वापरू शकता. ते कडुलिंबाच्या पानांसारखे कच्चे चावता येते. ते रस बनवून देखील सेवन केले जाऊ शकते.
- पिंपळाची पाने गरम पाण्यात उकळून चहा बनवू शकता.
- पिंपळाच्या पानांचा लेप त्वचेवरील समस्यांवर लावल्यास फायदा होतो.
- पिंपळाच्या पानांचा सुगंध डोकेदुखी कमी करण्यास मदत करतो.
- पिंपळाची पाने पाण्यात उकळून त्याचे पाणी प्यावे.
- पिंपळाची पाने उकळून चहा बनवू शकता.
- पिंपळाची पाने सुकवून त्याची पूड बनवून वापरू शकता.
काही लोकांना पिंपळाच्या पानांपासून ऍलर्जी होऊ शकते, त्यामुळे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)