Meta Rayban Smart Glasses Launched In India : स्मार्टग्लास म्हणजेच चष्म्यांची दुनिया आता खूपच एडव्हान्स झाली आहे. हे तंत्रज्ञान आता भारतातही उपलब्ध झाले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या कंपन्यांचे मालक असलेल्या मेटा कंपनीने भारतात रे-बॅन स्मार्टग्लासेस लॉन्च केले आहेत.
या चष्म्यांचा वापर यूजर्स हात न लावता करू शकतात. यामध्ये वॉइस कमांडद्वारे नियंत्रण ठेवता येते. म्युझिक आणि पॉडकास्ट प्ले/पॉज करता येतात तसेच फोटो आणि व्हिडिओ देखील घेता येतात. मेटा रे-बॅन स्मार्टग्लासेसमध्ये बिल्ट-इन स्पीकर्स आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही चष्मा घालून म्युझिक ऐकू शकता आणि कॉलवर बोलूही शकता.

Meta Ray-Ban स्मार्टग्लासची किंमत
Meta Ray-Ban स्मार्टग्लासची किंमत ३०,००० रुपयांपासून सुरू होते आणि ती ३५,७०० रुपयांपर्यंत जाते. कंपनीने यामध्ये शाइनी आणि मॅट ब्लॅक यांसारखे विविध मॉडेल्स सादर केले आहेत. रे-बॅन स्मार्टग्लासेस Ray-Ban.com वरून ऑर्डर करता येतील. यांचे रोलआउट १९ मे पासून ऑनलाइन आणि स्टोअर्सवर सुरू होईल.
Meta Ray-Ban स्मार्टग्लासचे फीचर्स
मेटा रे-बॅन स्मार्टग्लास सर्वप्रथम २०२३ मध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले होते. कंपनीने त्यांची सखोल चाचणी केली आणि हे चष्मे चर्चेचा विषय बनले. आता हे स्मार्टग्लास भारतात सादर करण्यात आले आहेत. यावेळी या चष्म्यात AI क्षमताही जोडण्यात आली आहे, जेणेकरून यूजर्स हात न लावता याच्या माध्यमातून अनेक कामे करू शकतील. सोबतच, हे प्लग इन करून, पॉडकास्ट ऐकता येतात. चर्चा फोनवर करता येते. फोटो काढता येतात आणि व्हिडिओही बनवता येतात.
फोटो काढण्यासाठी रे-बॅन स्मार्टग्लासमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. यामध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन AR1 Gen1 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो कोणतेही काम झपाट्याने पूर्ण करू शकतो. यात एक आकर्षक चार्जिंग केस आहे आणि कंपनीचा दावा आहे की या चष्म्याची बॅटरी लाइफ ३६ तास आहे.
लाईव्ह स्ट्रिमिंगही करता येणार?
हे चष्मे घालून यूजर्स फेसबुक आणि इंस्टाग्राम वर लाइव्हस्ट्रीम करू शकतील. त्यांना IPX4 रेटिंग दिली गेली आहे, जी चष्म्याला पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून सुरक्षित ठेवते. कंपनीचे म्हणणे आहे की लवकरच या चष्म्याद्वारे थेट मेसेज पाठवणे शक्य होईल. फोटो पाठवणे आणि ऑडिओ-व्हिडिओ कॉल करणेही शक्य होईल. मात्र, ऑडिओ-व्हिडिओ कॉल आणि मेसेज पाठवण्याचे कार्य वॉट्सअॅप आणि मॅसेंजरद्वारे केले जाईल.