Wwe Raw And Backlash 2025 On Netflix : WWE आणि नेटफ्लिक्स यांची भागीदारी चांगली यशस्वी ठरत आहे. ‘मंडे नाईट रॉ’ आणि ‘बॅकलॅश २०२५’ हे शो नेटफ्लिक्सच्या जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर पोहोचले आहेत. RAW चा ५ मेचा एपिसोड २.८ मिलियन्स वेळा पाहिला गेला.
तर WWE रॉ आणि बॅकलॅश २०२५ यांनी नेटफ्लिक्सच्या ग्लोबल रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे. ट्यूडमच्या रिपोर्टनुसार, रॉ’चा १८ वा एपिसोड ५ मे रोजी ओमाहा, नेब्रास्का येथून थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. या एपिसोडमध्ये रेसलमेनिया ४१ मधील मोठ्या स्टोरी पुढे दाखवण्यात आल्या, ज्यामध्ये बेकी लिंच आणि सेठ रॉलिन्स यांचा समावेश होता. हा एपिसोड गेल्या ७ दिवसांमध्ये इंग्रजी भाषेतील शोमध्ये चौथ्या स्थानावर होता.

नेटफ्लिक्सच्या रिपोर्टमध्ये खुलासा
नेटफ्लिक्सच्या अहवालानुसार, ५ मेच्या एपिसोडला २.८ मिलियन व्ह्यूज मिळाले. हे मागील आठवड्याच्या तुलनेत २ लाखांनी कमी असले तरी रेसलमेनिया ४१ पूर्वीच्या व्ह्यूजइतकेच होते. NBA आणि NHL प्लेऑफ सामन्यांचा थरार सुरू असूनही, WWE रॉने अमेरिकन मार्केटमध्ये तिसरे स्थान पटकावले. हा सलग चौथा आठवडा आहे, जिथे हा शो देशांतर्गत रँकिंगमध्ये टॉपच्या शोमध्ये राहिला आहे.
WWE शो कोणत्या देशात कोणत्या स्थानावर?
WWE ने एका ट्विटद्वारे माहिती देत सांगितले आहे, की “WWE रॉ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
विविध देशांमध्ये या शोचे स्थान
- ऑस्ट्रेलिया: रॉ ९व्या स्थानावर
- बोलिविया: रॉ ४थे, बॅकलॅश ३रे, स्मॅकडाऊन ९व्या स्थानी
- कॅनडा: रॉ ४थे, बॅकलॅश ५व्या स्थानी
- युनायटेड किंगडम: रॉ ६वे, बॅकलॅश ५व्या स्थानी
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की WWE चे शो वेगवेगळ्या देशांमध्ये चांगली लोकप्रियता मिळवत आहेत.
बॅकलॅश २०२५ इव्हेंटमध्ये जॉन सीना उपस्थित होता
बोलिवियामध्ये बॅकलॅश तिसऱ्या स्थानावर होता, तर कॅनडामध्ये पाचव्या स्थानावर राहिला. मेक्सिको आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांमध्ये बॅकलॅश पाचव्या स्थानावर राहिला आणि भारतात तो दहाव्या स्थानावर होता.
WWE चा नेटफ्लिक्सवरचा विस्तार वाढत आहे. यामुळे WWE जगभरातील अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. चाहत्यांना येणाऱ्या शोमध्ये आणि प्रीमियम लाईव्ह इव्हेंटमध्ये आणखी रोमांचक कथा पाहायला मिळतील.