Maharashtra Government – महायुती सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विविध विभागातील कामांचा १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. सरकारी कामे तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पहिल्यांदाच राबविण्यात आलेला १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम. तसेच शासन लोकाभिमुख करण्याचा हा उपक्रम आपल्या शासनाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे.
या मोहिमेत महिला व बालविकास विभागाने केलेल्या कार्यालयीन सुधारणा अंतर्गत सर्व विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्री आदिती तटकरे व सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांचा सत्कार करण्यात आला.

प्रशासनात लोकाभिमुखता, कामकाजात सुलभता
या कार्यक्रमांर्तगत राज्यातील 12 हजार 500 कार्यालयांना सुधारणा करण्याची संधी देण्यात आल्याने यामध्ये सर्व कार्यालयांनी सकारात्मक सहभाग दर्शवला आहे. प्रशासनात लोकाभिमुखता, कामकाजात सुलभता आणि जबाबदारी (अकाउंटेबिलिटी) या तीन आधारांवर पुढे जाणे अत्यावश्यक असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ उपलब्ध करून देऊन शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न केला.
कामांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध…
विभागाच्या योजनांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी विभागाचे संकेतस्थळ युजर फ्रेंडली केले आहे. http://womenchild.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ मराठी तसेच इंग्रजी भाषेत आले. सर्वच विभागाने स्तुत्य कार्य केले असून, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना महिला व बालकापंर्यत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा राबविली. महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम आणि आरटीएस कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.