हे पळपुटे सरकार, अडचणीत येईल म्हणून पळ काढत आहेत, जयंत पाटलांची टिका

वांगणीला घर नाकारल्यास कामगारांना घरांचा हक्क राहणार, असं म्हणत या मोर्चाला संबोधित करताना जयंतराव पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Jayant Patil : गिरणी कामगारांच्या वतिने आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आझाद मैदानात उपस्थित राहिले. यावेळी जयंत पाटील बोलताना सरकारवर टिकास्त्र डागले. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार, असं यावेळी
जयंत पाटील म्हणाले.

गिरणी कामगारांना बाहेर फेकले जाते…

मुंबईत जवळपास ७६ एकर जागा उपलब्ध आहे, मात्र सरकार गिरणी कामगारांना मुंबईतून विस्थापित करून दूर शेलू आणि वांगणीला पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. गिरणी कामगारांना हे मान्य नाही. त्यामुळे त्यांचा गोष्टीला प्रचंड विरोध आहे. सरकार यावर तोडगा काढत तर नाहीच उलट शेलू, वांगणीला घर नाकारल्यास कामगारांना घरांचा हक्क राहणार असं म्हणत या मोर्चाला संबोधित करताना जयंतराव पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हे पळपुटे सरकार…

खरं तर पळपुटे सरकार आहे. अडचणीत येईल म्हणून अधिवेशनही गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे, अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सभागृहात आणि सभागृहाबाहेर तुमच्या प्रश्नांना वाचा फोडेल, गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार, अशी ग्वाही गिरणी कामगारांना यावेळी जयंत पाटील यांनी दिली.


About Author

Astha Sutar

Other Latest News