मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2014 रोजी प्रवीण परदेशी यांनी अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालय कार्यालयात निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे लवकरच मोठी जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आता त्यांना मुख्यंत्र्यांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे.
प्रवीण परदेशी – देवेंद्र फडणवीसांचे संबंध खास…
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात प्रवीण परदेशी यांनी अतिरिक्त मुख्य सचिवपदाचे काम पाहिले होते. प्रवीण परदेशी यांच्या कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच समाधानी राहिलेले आहेत. त्यामुळं प्रवीण परदेशी आणि देवेंद्र फडणवीस यांचे खास संबंध आहेत. प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली होती. मात्र आता निवृत्तीनंतर प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नवी जबाबदारी सांभाळणार आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि राज्याची अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी अनुभवी प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त केले जाणार आहे. प्रवीण परदेशी यांनी काही काळ राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. प्रवीण परदेशी हे सध्या ‘मित्रा’ या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष आहेत.

परदेशी यांनी सांभाळलेली जबाबदारी….
* परदेशी हे 1985 च्या आयएएस बॅचमधील अधिकारी आहेत.
* फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात परदेशी अतिरिक्त मुख्य सचिवपद भूषविले
* बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष
* ‘मित्रा’ या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष
* मुंबई हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष
* यानंतर त्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.