अध्यक्ष किती काळ विचार करणार? विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावरून विरोधक आक्रमक आणि सभात्याग

विधानसभा अध्यक्षांना पत्र देऊनही ते निर्णय घेत नाहीत, त्यामुळं आम्ही सभागृहातून सभात्याग करत सरकारचा निषेध करतो, असं आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी विरोधक आक्रमक होत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Mansoon session – पावसाळी अधिवेशनातील आज दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेतील विरोधी पक्षपदावरुन विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विधानसभा विरोधी पक्षनेता नसतील. ही बाब सभागृहाला भूषणावह नाही. त्यामुळं विरोधी पक्षनेतेपदावरून विधानसभेत विरोधक आक्रमक होत सभात्याग केला.

सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे….

दुसरीककडे यापूर्वीही सरकार स्थापन झाल्यानंतर चार महिन्यानंतर विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्यात आली आहे. असा दाखला अध्यक्षांनी दिला. मात्र गेल्या काही महिन्यापासून आपण यावर विचार करत आहेत, मात्र निर्णय कोणताही घेत नाही. केवळ वेळ घालवत आहात. असं भास्कर जाधव आणि जयंत पाटील म्हणाले. तर आज आम्ही हे सरकार कसे लोकशाही गळा घोटत आहे. लोकशाही पद्धतीने काम करत नाही… विरोधकांचा आवाज दाबत आहे. आणि सरकार येऊन सहा महिने झाले तरी अजून विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय नाही, आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांनी

आत्ताच निर्णय घ्या, असं म्हणणे चुकीचं…

दरम्यान, आज महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज विधीमंडळात सत्कार होत आहे. हे आपल्या सर्वासाठी अभिमानाची बाब आहे. पण यावेळी विरोधी पक्षाची खुर्ची खाली असणार, त्यामुळं विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय लवकर विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं आमदार भास्कर जाधव म्हणाले. तर मी सर्व घटना आणि कायद्याचा विचार करुन यावर योग्य वेळी निर्णय घेईल, आणि याचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकाह हा मला आहे,

त्यामुळं योग्य वेळी योग्य निर्णय घेईन. असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. दुसरीकडे विरोधकांनी आत्ताचा आता विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घ्या, असं म्हणणे चुकीचं असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News