निवृत्तीनंतर 77 वर्षीय निवृत्त शिक्षिकेचा क्रूझवर राहण्याचा निर्णय, 15 वर्ष करणार जगाची सफर

त्यांची पहिली जागतिक यात्रा साडे तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. या काळात शेरोन 147 देशांना आणि 425 ठिकाणांना भेट देणार आहेत. वैंकूवर आणि अलास्कातून शेरोन यांनी यात्रेची सुरुवात केली असून आता क्रूझ जपान, तैवान आणि न्यूझीलंडला जाणार आहे.

नवी दिल्ली – निवृत्तीनंतर घरात आराम करण्याचा पर्याय अनेक जणं स्वीकारतात, मात्र याच्या विरुद्ध निर्णय अमेरिकेतल्या एका निवृत्त शिक्षिकेनं घेतलाय. 77 वर्षीय शेरोन लोन यांनी घर सोडून एका क्रूझवर 15 वर्ष घालवण्याचा संकल्प सोडलाय. पाहूयात.

अमेरिकेतली सेवानिवृत्त शिक्षिका शेरोन लेन आता या क्रूझवर राहणार आहेत. निवृत्तीनंतर जगाची सफर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी 1.11 कोटी रक्कम खर्च करत त्यांनी व्हिला व्ही ओडिसी नावाच्या क्रूझवर केबिन खरेदी केलीय. आता पुढची 15 वर्ष व्हिलावरील केबिन हेच शेरोन यांचं घर असणार आहे.

कशी आहे क्रूझवर व्यवस्था ?

या क्रूझवरची केबिन दीर्घकाळ घरासारखी खरेदी करण्याची सोय आहे.
१. क्रूझवरील केबिनची किंमत 1.11 कोटी रुपये
२. मासिक शुल्कात जेवण, वैद्यकीय सेवा उपलब्ध
३. क्रूझमध्ये वायफाय, लायब्ररी, क्लब, स्पाची सोय
३. पिकलबॉल कोर्ट, लाउंज, फिटनेस सेंटर आणि स्विमिंग पूल
४. क्रूझवर फाईव्ह-स्टार हॉटेलसारख्या सुविधा
५. हाऊसकीपिंग, रुम सर्व्हिस, लाँड्रीची व्यवस्था

2023 साली शएरोन यांनी ही केबिन खरेदी केली आणि डिसेंबर 2024 मध्ये जहाज सॅन डिओगोत पोहचल्यानंतर त्या क्रूझमध्ये दाखल झाल्यात.

शोरेन यांनी हा मार्ग का स्वीकारला?

जगाची समुद्रसफर करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाच्या 77 व्या वर्षी शेरोन यांनी हा निर्णय घेतलाय.

1. शेरोन लेन कॅलिफोर्नियातील निवृत्त शिक्षिका
२. क्रूझवर राहून समुद्र सफर करणं हे स्वप्न
३. अमेरिकेत घरात राहण्यापेक्षा क्रूझवर राहणं स्वस्त
४. क्रूझवर काळजी घेण्याची किंवा करण्याची गरज नाही
५. क्रूझमध्ये प्रत्येक गरज पूर्ण करण्याची क्षमता

147 देशांची करणार सफर

ही क्रूझ समुद्र और नदी या दोन्ही ठिकाणी चालू शकते.
त्यांची पहिली जागतिक यात्रा साडे तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. या काळात शेरोन 147 देशांना आणि 425 ठिकाणांना भेट देणार आहेत. वैंकूवर आणि अलास्कातून शेरोन यांनी यात्रेची सुरुवात केली असून आता क्रूझ जपान, तैवान आणि न्यूझीलंडला जाणार आहे. शेरोन यांच्या याधाडसाचं  जगभरातून कौतुक करण्यात येतंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News