नवी दिल्ली – उंटाच्या अश्रूतून हजारोंची कमाई होतेय, तुमचा विश्वास बसणार नाही मात्र राज्यस्थानात हे घडतंय. उंटाच्या अश्रूचा एक थेंब २६ सापांच्या विषावर जालीम इलाज असल्याचा शोध लागलाय. त्यामुळं उंटाच्या अश्रूची मागणी वाढलीय.
वाळवंटात अत्यंत उपयुक्त प्राणी अशी उंटाची ओळख.. मात्र आता एका नव्या संशोधनानं उंटाचं महत्त्व आणखी वाढलंय.
उंटांच्या अश्रूत सापडलेल्या एंटीबॉडीजमध्ये 26 विषारी सापांचं विष निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचं समोर आलंय.
बिकानेरमधील उंटांवर संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय संशोधन केंद्रानं हे शोधून काढलंय.
यानंतर आता उंटांच्या रक्तांचे नमुने आणि अश्रू गोळा करण्याचं काम सुरु करण्यात आलंय.
यासाठी उंटांच्या मालकांना 5 ते 10 हजार देण्यात येतायेत.

उंटाच्या अश्रूंचा सापांच्या विषावर इलाज
उंट वाळवंटातील महत्त्वाचा जीव मानण्यात येतो. वाळवंटातील स्थितीवर मात करण्यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्ती या प्राण्यात आहे. त्यासोबतच वाळवंटातील सापांचं विष पचवण्याची प्रतिकारशक्तीही निसर्गताच उंटाकडे असते. संशोधनानं हे सिद्ध झालंय.
1. उंटांच्या अश्रूंमध्ये सापाच्या विषाचा प्रभाव रोखण्याची ताकद
2. संशोधनावेळी उंटांना विषारी सॉ स्केल्ड वायपर स्नेकचं विष देण्यात आलं.
3. त्यानंतर उंटाच्या रक्ताचे नमुने आणि अश्रूंची तपासणी करण्यात आली.
4. तपासणीत उंटांच्या शरीरात विष रोखणाऱ्या एँटीबॉडीज असल्याचं समोर
5. घोड्यांपासून तयार होणाऱ्या सापांवरील विषावरील औषधापेक्षा उंटाच्या अश्रूंमध्ये अॅलर्जीचा धोका कमी
6. यापूर्वी लिवरपूल आणि दुबईच्या रिसर्च सेंटरमध्ये उंटाचे अश्रू उपयुक्त असल्याचं समोर
उंटांचा भाव वधारला
या नव्या संशोधनामुळे उंटांच्या अश्रूंचा भाव वधारलाय. उंट मालकांनाही अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.
उंटाच्या अश्रूंमध्ये सापांचं विष प्रभावहीन करण्याची क्षमता असल्याचा शोध महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
देशात सर्पदंशामुळे दरवर्षी 58 हजार जणांचा मृत्यू होतो.
यातील अनेक मृत्यू हे ग्रामीण भागात होतात. सर्पदंशावर प्रभावी औषधही तितक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत.
अशा स्थितीत उंटाच्या अश्रूंचा आता उपयोग करता येणार आहे.
सर्पदंशांमुळे होणाऱ्या मृत्यूंच प्रमाण उंटांच्या अश्रूंच्या औषधानं भविष्यात कमी होईल अशी आशा आहे.