नवी दिल्ली- सरकारनं उद्या तुम्हाला फुकट पैसे वाटले तर.. तुमचा विश्वास बसणार नाही पण दक्षिण कोरियात हे प्रत्यक्षात घडतंय. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नागरिकांना फुकट पैसे वाटण्याचा निर्णय दक्षिण कोरिया सरकारनं घेतलाय.
आशिया खंडातील चौथ्या क्रमांकावरील मोठी अर्थव्यवस्था असलेल्या दक्षिण कोरियात सध्या फुकट पैसे वाटण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना कंझ्मशन कुपन वाटण्यात येणार आहेत. या कुपनच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे खर्च करावेत, अशी सरकारची इच्छा आहे.

बजेटमध्ये 2 लाख कोटींची तरतूद
नागरिकांना फुट पैसे वाटण्यासाठी सरकारनं बजेटमध्ये २ लाख कोटींची तरतूद केली आहे.
दक्षिण कोरियात कसे वाटणार पैसे?
1. नागरिकांना फुकट पैसे वाटण्यासाठी 31.8 ट्रिलियन वॉन म्हणजे 2.19 लाख कोटी रुपयांचं बजेट
2. 21 जुलै ते 12 सप्टेंबरपर्यंत पैसे फुकट वाटले जाणार
3. दक्षिण कोरियातील सगळ्या नागरिकांना 18 जुलैपर्यंत एकत्रित 1,50,000 वॉन म्हणजेच 9,150 रुपये देण्यात येणार
4. हे पैसे क्रेडिट, डेबिट, प्रीपेड कार्ड किंवा स्थानिक प्रशासनाच्या वतीनं गिफ्ट सर्टिफिकेटद्वारे
गरिबांना अधिक पैसे फुकट
त्यातही दक्षिण कोरियातील गरिबांना अधिक पैसे सरकारकडून देण्यात येणार आहेत.
1. गरीब कुटुंब आणि एकल माता-पित्यांच्या परिवाराला 3 लाख वॉन म्हणजे 18300 रुपये
२. बेसिक लिव्हिंग अलाउन्स मिळणाऱ्यांना 4 लाख वॉन म्हणजे 24,400रुपये
३. ग्रामीण परिसरात राहणाऱ्यांना जादाचे 50 हजार वॉन म्हणजेच 3,050 रुपये
४. कमी उत्पन्न असणाऱ्यांना 1 लाख वॉन म्हणजे 6 हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळणार
अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा उपाय
अर्थव्यवस्थेचा चालना देण्यासाठी हे सगळे उपाय करण्यात येतंय. दुसरीकडे हे पैसे मोफतच वाटले जात नाहीयेत असा दावा सरकारच्या वतीनं करण्यात येतोय.
कोणत्याही विकसीत देशात कल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा आणि इतर आर्थिक धोरणांनुसार नागरिकांना मदत केली जाते, तशीच मदत केली जात असल्याचा दावा करण्यात येतोय.
पंधरा लाख बँकेच्या खात्यात जमा होतील असं स्वप्न भारतीयांनी पंधरा वर्षापूर्वी पाहिलं होतं. ते पूर्ण झालं नसलं तरी दक्षिण कोरियात मात्र सरकार योजनांच्या माध्यमातून फुकट पैशांचं वाटप प्रत्यक्षात होतोना दिसतंय.