Bharat Bandh on 9 July : बुधवारी भारत बंद, काय बंद-काय सुरू राहणार? 25 कोटी कर्मचारी संपावर जाणार

उद्या 9 जुलै रोजी देशातील 25 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- देशातील 25 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी उद्या देशव्यापी संपावर जाणार आहेत. यामुळे बँका, पोस्ट, कोळसा, हायवे, परिवहन सेवा यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या सेवा 9 जुलैला प्रभावित होतील अशी चर्चा आहे.

10 केंद्रीय ट्रेड यूनियन आणि त्यांच्याशी संबंधित संघटना या संपात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हा संप पुकारण्यात आलाय. केंद्र सरकारची धोरणं ही कामगार विरोधी, शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करण्यात आलाय.

या संपात कोण कोण सहभागी होणार?

या संपात देशातील 25 कोटींहून अधिक सरकारी कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. यात बँक, पोस्टखाते, विमा, परिवहन, सरकारी कंपन्या यातील कर्मचारी सामील होणार आहेत. यासह शेतकरी आणि ग्रामीम मजूरही या संपात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येतंय. रेल्वे आणि पर्यटन यासारख्या अत्यावश्यक सेवांना या संपातून वगळण्यात आलंय.

कोणत्या संघटना संपात सहभागी होणार
१. ऑल इंडिया ट्रेड यूनियन काँग्रेस
२. हिंदू मजूर सभा
३. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन
४. इंडियन नॅशनल ट्रेड यूनियन काँग्रेस
५. ट्रेड युनियम कटर्डिनेशन सेंटर
६. सेल्फ एप्लाईड वुमन असोसिएशन
७. ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड यूनियन
८. लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन
९. युनायडेट ट्रेड यूनियन काँग्रेस

संपाचं कारण काय

केंद्र सरकारची धोरणं ही कामगार आणि शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा कर्मचारी संघटनांचा दावा आहे. कॉर्पोरेट आणि बड्या उद्योगपतींना नफा मिळावा यासाठी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचं खासगीकरण करत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. चार नव्या कामगार कायद्यांनुसार कामगारांचा संप करण्याचा हक्क कमकुवत करण्याची सरकारची योजना असल्याचं संघटनांचं म्हणणं आहे

काय बंद?

बँकिंग सेवा
विमा कंपन्यांचे काम
पोस्ट ऑफिस
कोळसा खाणींचे काम
सरकारी बस
महामार्ग आणि रस्ते बांधकाम
सरकारी कारखाने
कंपन्यांचे उत्पादन

काय सुरू?

खासगी कंपनी
रुग्णालये
वैद्यकीय
आपत्कालिन सेवा
खासगी शाळा
महाविद्यालये
ऑनलाइन सेवा

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News