राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाचा नवा अंदाज आता समोर आला आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह अत्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे घाट माथा, सातारा घाटमाथा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा यांचा समावेश आहे. तर मराठवाड्यात या काळात तुरळक पावसाचा अंदाज आहे.
पुढील 4 दिवस पावसाचा जोर राहणार
राज्यातील पावसाचा हा जोर पुढील चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील 9 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तिकडे मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा-विदर्भात कसा राहिल पाऊस?
पालघरमधील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
पालघर जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, रविवारी संध्याकाळी हवामान विभागाने सोमवारी सुद्धा अलर्ट जाहीर केल्याने वादळासह मोठ्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा, कॉलेजेसला सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी, आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित, सर्व आश्रमशाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांंना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.